News24सह्याद्री - औंध येथे ६०० कोटी रुपये खर्चून अद्ययावत साथरोग रुग्णालय..पहा सकाळच्या ताज्या बातम्यांचे अपडेट
TOP HEADLINES
1. पर्यावरणवादी तरुणी अटकेत स्वीडिश पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग हिचे शेतकरी आंदोलनाशी संबंधित कथित ‘टूलकिट’ समाजमाध्यमावरून प्रसारित केल्याबद्दल बेंगळूरुतील दिशा रवी या २२ वर्षीय पर्यावरण कार्यकर्तीला दिल्ली पोलिसांनी शनिवारी अटक केली. ती टूलकिट प्रकरणातील प्रमुख कारस्थानी असल्याचे पोलिसांनी सांगितले.
2. राज्यात दिवसभरात ४ हजार ९२ करोनाबाधित
राज्यातील करोना संसर्ग पुन्हा काहीसा वाढताना दिसत आहे. मागील काही दिवसांपासून दररोज करोनाबाधितांची संख्या पुन्हा वाढत आहे. आज दिवसभरात राज्यात ४ हजार ९२ करोनाबाधित रुग्ण वाढले. तर, १ हजार ३५५ जण करोनातून बरे झाले.राज्यात आतापर्यंत १९ लाख ७५ हजार ६०३ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.७ टक्के झाले आहे.
3. ‘जैश’चा दिल्लीत हल्ल्याचा कट
जैश -ए -मोहम्मद ही दहशतवादी संघटना दिल्लीत हल्ला करण्याचा कट आखत असल्याची माहिती जम्मू-काश्मीरच्या पोलीसप्रमुखांनी रविवारी दिली. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्या कार्यालयाचे चित्रण करणाऱ्या दहशतवाद्याच्या अटकेपाठोपाठ आतादिल्लीत हल्ला करण्याची ‘जैश’च्या कटाची माहिती उजेडात आली आहे.
4. आसाममध्ये सत्तेवर आल्यास सीएए अंमलबजावणी नाही
भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे आसामला विभाजित करत असल्याचा आरोप काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी रविवारी केला. आपला पक्ष आसाम करारातील प्रत्येक तत्त्वाचे संरक्षण करेल आणि राज्यात सत्तेवर आल्यास सुधारित नागरिकत्व कायद्याची (सीएए) कधीही अंमलबजावणी करणार नाही, असे त्यांनी सांगितले.
5. हळदीला उच्चांकी दहा हजार रुपयांचा भाव
वसमत येथील कृषी उत्पन्न बाजार समिती यार्डात झालेल्या हळदीच्या सौद्यात उच्चांकी १० हजार ३०० रुपयांचा दर मिळाला. हिंगोलीच्या मार्केट वेळात सात ते नऊ हजार रुपये प्रति क्विंटल हळदीला भाव मिळाला. नवी हळद बाजारात विक्रीसाठी क्वचितच येत आहे.
6. औंध येथे ६०० कोटी रुपये खर्चून अद्ययावत साथरोग रुग्णालय
करोनाने संपूर्ण जगात धुमाकूळ घातल्यानंतर जगभरात साथरोग आजारावरील संशोधनाला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे. भारतात करोनाचे सर्वाधिक रुग्ण व मृत्यूची नोंद महाराष्ट्रात असून या पार्श्वभूमीवर पुणे औंध येथे ६०० कोटी रुपये खर्चून सुसज्ज साथरोग रुग्णालय उभारण्याची योजना राज्य सरकारने आखली आहे.
7. चंद्रकांत पाटलांची ठाकरे सरकारवर टीका
“महाभकास आघाडीच्या तीन चाकी सरकारच्या प्रत्येक चाकात अनेक ठिकाणी छिद्रे पडली आहेत. अनेक मंत्र्यांच्या कारनामे, भानगडी व मुजोरपणामुळे जनता मेटाकुटीस आलीय.” अशी टीका भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसच्या महाविकासआघाडी सरकारवर केली आहे.
8. शिवजयंती साजरी करताना मात्र करोनाची काळजी घ्यावी
छत्रपती शिवाजी महाराज ही राज्याची नाही तर देशाची अस्मिता आहे, त्यामुळे शिवजयंती साजरी झालीच पाहिजे. पण शिवजयंती साजरी करताना मात्र करोनाची काळजी घेण्यात यावी. ही प्रशासनासोबत आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, असे खासदार उदयनराजे भोसले यांनी सांगितले.
9. नाशिक महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याची तयारी ठेवा
आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी पक्ष संघटन अधिक मजबूत करत कामाला लागावे. तसेच वरिष्ठ पातळीवर काय निर्णय होईल याची वाट न बघता प्रसंगी नाशिक महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढण्याचीदेखील तयारी ठेवा, असे आदेश राज्याचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांना दिले.
10. कार व दुचाकीचा भिषण
अकोल्यातील म्हैसांग महामार्गावर गतीरोधक नसल्यामुळे दिवसा गणिक छोटे - मोठे अपघात घडत असून कित्येक जण मृत्यूमुखी पडत आहेत .म्हैसांग महामार्गावरुन 24 तास वाहतूक होत असल्यामूळे अपघातांच्या प्रमाणात वाढ होत आहे काल बंधुगोटाफाटा नजीक कार व दुचाकीचाभिषण अपघात झाला असून कार चालक घटनास्थळावरुन फरार झाला आहे.
No comments
Post a Comment