राज्य सरकारने ईडीची वाट न पाहता त्यांच्याकडे असलेली सीडी काढावी : देवेंद्र फडणवीस
News24सह्याद्री -
मुंबई -
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस त्यांनी विधान परिषदेच्या पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचारासाठी सोलापूरमध्ये पत्रकारांशी बोलत असताना, शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यावरील ईडीच्या कारवाईवर भाष्य केले आहे. चूक असेल तर एजन्सी कारवाई करेल, चूक नसेल तर घाबरण्याचे कारण नाही, अशी प्रतिक्रिया फडणवीसांनी दिली आहे. तसेच राज्य सरकारने ईडीची वाट न पाहता त्यांच्याकडे असलेली सीडी काढावी, असे खुले आव्हानही दिले आहे. तसेच, शिवेसना खासदार संजय राऊत टीका करण्याशिवाय दुसरे काय करणार, असा टोला देखील फडणवीस यांनी लगावला आहे.
तसेच पुढे म्हणाले की, राज्य सरकार नाकर्तेपणा दाखवत आहे, आम्ही विरोधी पक्षात काम करत आहोत. मात्र, तीन पक्षांची अनैसर्गिक आघाडी असणारे सरकार टिकणार नाही. ज्या दिवशी हे सरकार जाईल त्यावेळी आम्ही पर्याय देऊ, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहे. तसेच आगामी काळात मनसेला सोबत घेणार नसल्याचे फडणवीसांनी स्पष्ट केले आहे. तसेच,यावेळी देवेंद्र फडणवीसांनी अवकाळी पाऊसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची मदत, निसर्ग चक्रीवादळ, शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यावरील ईडीची कारवाई, आणि वाढीव वीजबिलांवरुन राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

No comments
Post a Comment