Breaking News

1/breakingnews/recent

सारीपाट सह्याद्रीचा - राष्ट्रवादी वगळता भाजपा, शिवसेनेत का वाहू लागलेत नाराजीचे वारे?

No comments

     News24सह्याद्री - 



अहमदनगर महानगरपालिकेतील स्वीकृत नगरसेवक निवडीच्या पार्श्वभूमीवर नगरमध्ये मोठे महाभारत घडले. राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी म्हणजेच आ. संग्राम जगताप यांचं नेतृत्व त्या पक्षातील इच्छुकांनी अर्थात सर्व नगरसेवकांनी मान्य केले. राजकीय पक्षांमध्ये काय घडले याचा उहापोह आपण घेणार आहोतच, परंतृू त्याहीपेक्षा यानिवडीच्या निमित्ताने प्रशासकीय पातळीवर जे घडले तर खूपच भयानक! आयुक्तांना आलेल्या अर्जांची छाननी करण्यास वेळ मिळाला नाही, असं स्पष्टपणे समोर आले आहे. यातील एक अर्ज वगळता बाकीचे चार अर्ज यापूर्वी फेटाळण्यात आले होते. मग, आता हे अर्ज मंज़ूर कसे झाले याचे उत्तर आयुक्तांनी ‘अर्ज छाननी करण्यास वेळ मिळाला नाही’, या वाक्यात देऊन ते किती गांभिर्याने काम करतात हे दाखवून दिले. स्वीकृत निवडीवरून शिवसेेनेत सर्वाधिक कलह निर्माण झाला. 

त्याच्याच जोडीने भाजपातही! मात्र, शिवसेना पुरती दुभंगली आहे आणि त्या दुभंगण्यास शिवसेनेतील नेत्यांनीच खतपाणी घातले हे आता लपून राहिलेले नाही. श्रद्धांजली सभेतील काही भाषणे आणि त्या भाषणादरम्यान काहींनी त्यांचा ऊर बडवून घेतल्याचे पाहून स्व. भैय्या नक्कीच रडले नसतील! उलटपक्षी ते त्यांच्या स्वभावगुणानुसार मोठमोठ्याने हसले असतील. ज्यांनी ऊर बडवून घेतला त्यांनीच भैय्यांना शेवटच्या दोन वर्षात सर्वाधिक त्रास दिला आणि त्यांचा पराभव झाला. याबाबत सविस्तर विश्‍लेषण असेलच! मात्र, शिवसेना अनिलभैय्या यांच्या हयातीत आणि हयातीनंतरही फुटीच्या उंबरठ्यावर आहेच! ही फुट शिवसेनेतील काही नेत्यांनी पाडली आहे आणि नगरमध्ये त्यातून राष्ट्रवादीची सोय कशी होईल याची काळजी घेतली जात आहे.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *