Breaking News

1/breakingnews/recent

जिल्ह्याची खबरबात - कान्हूराज बागाटे यांच्या विरुद्ध तक्रार अर्ज दाखल

No comments

 News24सह्याद्री - कान्हूराज बागाटे यांच्या विरुद्ध  तक्रार अर्ज दाखल...पहा जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्या 


TOP HEADLINES
1. १ लाख ७० हजारांची अफूची झाडे जप्त
जामखेड तालुक्यातील जातेगाव येथे काळे वस्तीवर अफुची झाडे लावलेल्या शेतात जामखेड पोलिसांनी टाकला या  छाप्यात  १ लाख ७० हाजारांची ५६ किलो वजनाची झाडे जप्त करण्यात अली आहेत.

2. विनामास्क फिरणाऱ्यांवर ठोकला दंड  
कोरोना च्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन व तहसील प्रशासनाणे विना मास्क धारकावर  कारवाई करत आहेत व्यापारी वर्ग ग्राहक व रस्ता वाहतूक यामध्ये विना मास्क धारकवर  कारवाई करण्यात येत आहे पोलीस ठाण्याचे एपीआय राठोड व त्यांच्या सहकाऱ्यांनी आज विना मास्क यांना दंड ठोकला आहे. 

3. शेती उद्योगाला जोड उद्योग म्हणून स्वंनिर्मित मिनी हॅचरी मशीन
शेती उद्योगाला नेहमी एक जोडीचा उद्योग असायला हवा. तसाच एक उद्योग म्हणजे कुकूटपालन. शेवगाव तालुक्यातील आखेगाव येथील प्रगतशील शेतकरी जालिंदर पायघन हे कुकुटपालनाचा व्यवसाय उत्तम रित्या चालवत आहेत. त्यांनी स्वतः मिनी हॅचरी मशीन बनवले आहे.

4. कोपरगाव तहसील कार्यालयाचा वीज पुरवठा खंडित
ऑगस्ट 2019 पासून 3 लाख 78 हजारांची थकीत रक्कम न भरल्याने कोपरगाव तहसील कार्यालयाचा वीज पुरवठा वीज वितरण कार्यालयाकडून खंडित करण्यात आला असल्याची माहिती वीज वितरण कार्यालयाचे सहायक अभियंता अतुल खंडारे यांनी दिली आहे.

5. कान्हूराज बागाटे यांच्या विरुद्ध  तक्रार अर्ज दाखल
राजमुद्रेचा गैरवापर झाल्याबद्दल श्री साईबाबा संस्थांनाच्या मुख्यकार्यकारी अधिकारी श्री. कान्हूराज बागाटे यांच्या विरुद्ध शिर्डी पोलीस स्टेशन ला सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांचा तक्रार अर्ज दाखल केला. 

6. शेवगावात घरकुल उतारा व चावी वाटप  
शेवगाव पंचायत समिती सभापती डॉ क्षितिज घुले यांनी ढोरजळगाव घरकुल सर्वसामान्य नागरिकांचा जीवनातील मुख्य आधार असल्याचे प्रतिपादन केले. ढोरजळगाव येथे प्रधानमंत्री आवास योजनेतील मंजूर झालेल्या घरकुलाची प्रत्यक्ष पाहणी करून घरकुल उतारा व चावी वाटप करण्याचा कार्यक्रम यावेळी पार पडला. 

7. रेखा जरे यांचा मुलगा रुणाल जरे यांचा उपोषण करण्याचा इशारा
यशस्वीनी  महिला ब्रिगेड च्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्येला 67 दिवस उलटून गेले परंतु अद्यापही त्यांचा मुख्य सूत्रधार बाळ बोठे यास अद्यापही अटक झालेली नाही तसेच त्याचा ठावठिकाणा देखील पोलिसांना लागलेला नाही रेखा जरे यांचा मुलगा रुणाल जरे याने प्रशासनाला एवढे सक्षम अधिकारी असताना देखील गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार फरार असून सरकार त्यास पाठीशी घालत आहे असा सवाल पोलिस प्रशासन तसेच यंत्रणेला केला आहे.
 
8. घराला भीषण आग सुदैवाने जीवित हानी नाही
राहुरी तालुक्यातील दरडगाव थडी येथील आदिवासी कुटुंबातील विजय पांडुरंग गांगर्डे यांच्या राहत्या घराच्या छताला काल दुपारी आग लागली घरात झोपलेल्या दोन मुलांना आईने जीवाची पर्वा न करता बाहेर काढल्याने सुदैवाने जीवितहानी झाली नाही मात्र..

9. अखेर जामखेड नगर परिषदेने केले तामिळनाडूचे पथक पाचारण
गेल्या अनेक वर्षांपासून जामखेड शहरात मोकाट वर्णांचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना होत आहे बरा हो मालकांना सांगूनही ते आपल्यावर यांचा बंदोबस्त करत नव्हते अखेर जामखेड नगर परिषदेमार्फत मोकाट डुकरांचा बंदोबस्त करण्यासाठी तमिळनाडू येथून एक पथक पाचारण करण्यात आला आहे. 

10. संगमनेर मध्ये पुन्हा कोविद सेंटर सुरु
संगमनेर नगर परिषदेच्या वतीने आजपासून पुन्हा कोविड सेंटर सुरू करण्यात आलेत कॉटेज हॉस्पिटल आवारामध्ये हे कोविड  सेंटर सुरू करण्यात येणार आहे राज्यामध्ये कोरोनाची दुसरी लाट  पुन्हा सुरू झाल्याने संगमनेर तालुक्यामध्येकोरोना रुग्णांचे प्रमाण वाढ होताना दिसत आहे. 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *