Breaking News

1/breakingnews/recent

26 फेब्रुवारी सह्याद्री टॉप १० न्युज

No comments

 News24सह्याद्री - माथाडी हमाल व श्रमजीवी कामगार संघटनेच्या राज्य समितीवर आमदार निलेश लंके....पहा  जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप १० मध्ये 


TOP HEADLINES

1. कोरोना बाबतचे नियम मोडणाऱ्यांकडून  90 हजार वसूल

कोरोनाच्या  वाढत्या संसर्गामुळे खबरदारीचा उपाय म्हणून नेवासा पोलिसांनी कारवाईचे सत्र सुरू केले बिना मास्क सोशल डिस्टन्स सार्वजनिक ठिकाणी थुंकणे अवैध वाहतूक विरोधात वाहतूक शाखेच्या पथकाने धडक मोहीम राबविली याअंतर्गत मागील आठ दिवसात 799 जणांवर दंडात्मक कारवाई करून 90 हजारांचा दंड वसूल केला. 

2. नवीन शाळा व्यवस्थापन समित्या स्थापन करा
शेवगाव तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांमधील शाळा व्यवस्थापन समित्यांची मुदत जून 2020 मध्ये संपली होती मात्र कोरोना संकटात शाळा कधी सुरू होतील हे नक्की नव्हते त्यामुळे राज्य शासनाने या समित्यांच्या नव्याने निवड न करता शाळा सुरू होईपर्यंत आहे. 

3. माथाडी हमाल व श्रमजीवी कामगार संघटनेच्या राज्य समितीवर आमदार निलेश लंके यांची वर्णी
नगर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांची माथाडी हमाल व श्रमजीवी कामगार संघटनेच्या राज्य समितीवर निवड झाली आहे.महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व  महाराष्ट्र शासनाच्या वतीने‌ सोमवार दि.२२ ‌फेब्रुवारी रोजी उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाचे  उपसचिव डॉ.श्रीकांत पुलकुंडवार यांनी राजपत्र केले. 

4. महावितरणचा तहसील कार्यालयाला झटका
कोपरगाव तहसील कार्यालयाच्या पाच लाखांच्यावर थकीत वीजबिलापोटी महावितरण विभागाच्या पथकाने गुरुवारी  वीजपुरवठा खंडित करून तहसील कार्यालयाला झटका दिला आहे.  भगवंत खराटे यांनी सांगितले की, 

5. साई संस्थानला न्यायालयाची नोटीस
 शिर्डीच्या साईबाबा संस्थानने पत्रकारांना मंदिर प्रवेश देताना विशिष्ट नियमावली घालून दिली आहे. परंतु ही नियमावली अन्यायकारक असल्याने पत्रकार माधव ओझा यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर न्यायालयाने साई संस्थानला नोटीस काढून म्हणणे मांडण्यास सांगितले आहे.

6. गोरगरिबांच्या स्वप्नपूर्तीसाठी शेवगाव पंचायत समिती सरसावली
 महाआवास योजनेचा तळागाळातील सर्व घटकांना लाभ मिळावा. गोरगरिबांच्या घराचे स्वप्न पूर्ण व्हावे, यासाठी शेवगाव पंचायत समिती सरसावली असून, विशेष नियोजन केले आहे. पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले यांच्या प्रयत्नातून तालुक्यात ९३३ घरकुले मंजूर झाली आहेत. 

7. मंत्री तनपुरेंच्या उपस्थितीत महत्वपूर्ण गोष्टीवर चर्चा होणार
 राज्याचे मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या अध्यक्षतेखाली वांबोरी चारीच्या पाण्यासंदर्भात चिचोंडी येथील शिवनेरी मंगल कार्यालयात उद्या  दुपारी चार वाजता बठकीचे आयोजन करण्यात आले आहे.  वांबोरी चारी टप्पा दोन बाबतही या बैठकीत महत्त्वपूर्ण चर्चा होणार असल्याने दोन्ही योजनांच्या लाभधारक शेतकर्‍यांनी शनिवारी दुपारी चार वाजता चिचोंडी येथील बैठकीस उपस्थित राहावे असे आवाहन संभाजीराव पालवे, मोहनराव पालवे यांनी केले आहे.  

8. बिल भरण्याचा शब्द देतात वीजपुरवठा सुरळीत
यंदा कुकडी कालव्याचे पाणी मिळण्यास विलंब झाला त्यामुळे विहिरी बोअरवेल बंद पडण्याच्या मार्गावर होते अशा परिस्थितीत महावितरणने थकित वीज बिलाचा नावाखाली रोहित्र बंद केली होती मात्र थकीत वीजबिल भरण्याचा शेतकऱ्यांनी शब्द देतात महावितरणने निघून जा तालुक्यातील पिंपळगाव पिसा खरातवाडी परिसरातील वीजपुरवठा सुरळीत केला
   
9. नगर जिल्ह्यात गुरुवारी २७८ कोरोना पॉझिटिव्ह

जिल्ह्यात आज १६८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ७३ हजार १११ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.१६ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (बुधवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत २७८ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १००६ इतकी झाली आहे.  

10. मंत्री गडाख यांच्या प्रयत्नामुळे रस्त्याचे काम पूर्ण
गेल्या कित्येक वर्षांपासून दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असलेला कौठा-म. ल. हिवरा रस्ता अखेर जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या प्रयत्नामुळे हा प्रश्न सुटला.आता या रस्त्याचे डांबरीकरण निम्यापर्यत झाले असल्याने गावकऱ्यांची अनेक वर्षांपासून होणाऱ्या त्रासापासून सुटका होणार आहे

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *