Breaking News

1/breakingnews/recent

16 फेब्रुवारी सह्याद्री सुपरफास्ट

No comments

  News24सह्याद्री - उद्धव ठाकरेंनी दिला शिवसैनिकांना महत्त्वाचा आदेश.....पहा देशातील,राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा


TOP HEADLINES

1. एक-दोन नव्हे, चाळीस घरं फोडली

घरफोड्या करणाऱ्या अट्टल दरोडेखोरांना अखेर सोलापूर पोलिसांनी अटक (Thieves Arrested By Solapur Police) केली आहे. आंध्र प्रदेश पोलिसांनीही या चोरट्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, गेल्या महिनाभरापासून हे चोरटे पोलिसांना चुकवत होते. अखेर आता सोलापूर पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या. 

2. जिल्हाधिकाऱ्यांकडून दंडात्मक कारवाई
पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात शासकीय बैठकीत मास्क न घातल्याने जिल्हा परिषद अध्यक्षा भारती कामडी यांच्यावर जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी दंडात्मक कारवाई केली आहे. मास्क विसरल्याची कबुली अध्यक्षा कामडी यांनी दिल्यानंतर त्यांना दोनशे रुपयांचा दंड आकारुन मास्क देण्यात आला. 

3. वासिम जाफरनं दिला राजीनामा; मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश
भारतीय संघाचा माजी सलामीवीर वासिम जाफर हा मागील अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. त्याच्यावर मुस्लिम खेळाडूंना प्राधान्य दिल्याचा आरोप केला जात होता. त्यामुळेच जाफरनं उत्तरखंड क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला. उत्तराखंड क्रिकेट संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी वासिमवर धर्मावर आधारीत संघ निवडीचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे.

4. ३९ जणांचा मृत्यू तर इतरांचा शोध सुरू
मध्य प्रदेशातील सीधी येथे बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात आतापर्यंत ३९ जणांचा मृतदेह सापडला आहे. मृतकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान सरकारने सर्व कार्यक्रम स्थगित केले असून मयताच्या कुटुंबीयांना ५ लाख रूपये नुकसान भरपाई देण्याची घोषणा केली आहे.

5. युद्ध लढलेले मेजर जनरल बीके महापात्रा यांचे निधन
मेजर जनरल निवृत्त बसंतकुमार महापात्रा यांचे सोमवारी रात्री निधन झाले. वयाच्या ८७ व्या वर्षी ओडिशाच्या भुवनेश्वर येथील रुग्णालयात अखेरचा त्यांनी श्वास घेतला. दिग्गज लष्कर अधिकारी मेजर जनरल बी.के. महापात्रा यांना लढाऊ अधिकारी म्हणून भारतीय लष्कराच्या आर्म्ड कॉर्प्स (टॅंक) वर नेण्यात आले. 

6. उद्धव ठाकरेंनी दिला शिवसैनिकांना महत्त्वाचा आदेश
सत्ता स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदाच शिवसेनेची पॉवरफुल बैठक आज शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackery) यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी राज्यातील प्रत्येक गावात शिवसेना पोहोचवा, असा महत्त्वाचा आदेश उद्धव ठाकरे यांनी आपल्या शिवसैनिकांना दिला.

7. ममतांचे माँ कँटीन देणार पाच रूपयांत जेवण
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोमवारी कोलकत्ता येथे  पाच रूपयांमध्ये जेवण देणारी ”माँ कँटीन” ही योजना सुरू केली. सुरूवातीला कोलकत्त्यामध्ये १६ ठिकाणी ही योजना राबवली जाईल, जिथे कमीतकमी एक हजारापेक्षा जास्त लोकांना दुपारचे जेवण देण्यात येईल.

8. गोपनीयतेबाबत व्हॉटसअ‍ॅपला नोटीस
युरोपीय देशांच्या तुलनेत भारतात व्हॉटसअ‍ॅप वापरकर्त्यांची गोपनीयता  कमी राखत असून न्यायलयानेच लोकांच्या गोपनीयतेचे रक्षण करावे, अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार व व्हॉटसअ‍ॅप यांना नोटिसा जारी केल्या आहेत.

9. कंटेनरने चार वाहनांना दिली धडक
मुबंई-पुणे एक्सप्रेस-वेवर भीषण अपघात झाला आहे. वाहनांनी एकमेकांना धडक देऊन झालेल्या या भीषण अपघाताच पाच जणांचा मृत्यू झाला असून, पाच जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये एका पाच वर्षाच्या मुलीचाही समावेश आहे. 

10. सांडपाणी प्रक्रिया केंद्र सुरू
तारापूर येथील जुन्या सांडपाणी प्रक्रिया केंद्राला पुन्हा कार्यरत करण्यासाठीही सशर्त परवानगी देण्यात आली आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाने अनेक निर्बंध घातले असले तरीसुद्धा हे प्रक्रिया केंद्र सुरू झाल्याने उद्योजकांना दिलासा मिळाला आहे.


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *