मोठी बातमी - आमदार निलेश लंके यांनी रात्री १ वाजता पाण्यात मारली डुबकी
News24सह्याद्री -
काम करण्याची अनोखी शैली आणि युवा कार्यकर्त्यांचा मोठा संच याच्या बळावर राज्यात वेगळी ओळख निर्माण करणारे पारनेरचे आमदार निलेश लंके यांचं एक वेगळं रूप पुन्हा एकदा समोर आले आहे. जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्शवभूमीवर सेवा सहकारी सोसायटी मतदार संघातील ठराव ज्यांच्या नावे झाले आहेत. अशा कार्यकर्त्यांना घेऊन सहलीवर रवाना झालेले आमदार निलेश लंके काल रात्री पनवेल जवळील एक रिसॉर्ट मध्ये चक्क कार्यकर्त्यांसोबत पोहताना दिसले.
रात्री एक वाजता कार्यकर्त्यांनी त्यांनी पोहण्याचा आग्रह केला आणि लंके यांनी पाण्यामध्ये डुबकी मारली. लंके यांच हे वेगळेपण आणि आग्रहाखात पहाटेच्या वेळी पाण्यात उतरण कार्यकर्त्यांना भावलं. या आधीही कार्यकर्ते बेडवर झोपलेले आणि लंके हे जमिनीवर झोपाल्याचं पाहायला मिळालं. आता रात्री १ वाजता आमदार निलेश लंके हे पाण्यात डुबकी मारताना दिसत आहेत.
No comments
Post a Comment