Breaking News

1/breakingnews/recent

शहराची खबरबात - जिल्हा बँकेच्या चारजागांसाठी आज मतदान

No comments

      News24सह्याद्री जिल्हा बँकेच्या चारजागांसाठी आज मतदान...पहा शहराची खबरबात मध्ये


TOP HEADLINES

1. कचरा आग प्रकरणाचा अहवाल महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे  
सावेडीतील कचरा डेपोला लागलेली आग चार दिवस धुमसत होती. परिसरात उठलेला धुराचा लोट व उग्र वासाने या भागातील नागरिक हैराण झाले होते. प्रदूषण नियंत्रण मंडळाने घटनास्थळाची पाहणी करून अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवला आहे. डेपोत सध्या पडून असलेल्या कचऱ्याची तातडीने विल्हेवाट लावण्याबाबत उपप्रादेशिक प्रदूषण नियंत्रण मंडळाने मुंबईच्या कार्यालयाला कळवले आहे. 

2. जिल्हा बँकेच्या चारजागांसाठी आज मतदान

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ४ जागांसाठी शनिवारी (२० फेब्रुवारी) सकाळी आठ ते सायंकाळी चारपर्यंत मतदान होणार आहे.जिल्ह्यातील १४ मतदान केंद्रांवर मतदान होईल. मतमोजणी रविवारी होईल. नगर, पारनेर व कर्जत तालुक्यातील विकास सेवा सोसायटी मतदारसंघासाठी, तसेच ११ तालुक्यांत केवळ बिगरशेती मतदारसंघासाठी मतदान घेण्यात येणार आहे. 

3. महानगरपालिकेच्या गरजू व्यक्तींना धनादेशांचे वाटप
महानगरपालिकेच्या वतीने महापौर वैद्यकिय सहाय्यता निधी तुन  महानगरपालिका हद्दीतील  गरिब  गरजू व  निराधार व्यक्तींना हदय शस्त्रक्रिया , कॅन्सर, मेंदूवरील शस्त्रक्रिया, मुत्रपिंड इत्यादी आजारावरील शस्त्रक्रियेसाठी व उपचारासाठी तसेच इतर आजारासाठी आर्थिक मदत धनादेशद्वारे दिली जाते.  याअंतर्गत   स्वाती खरात या रूग्णाला महापौर .बाबासाहेब वाकळे यांचे शुभहस्ते धनादेश देण्यात आला. 

4. रेशनिंगचा तांदूळ काळ्या बाजारात जाताना पकडला

नगर तालुक्यातील अरणगाव बायपास येथे मंगळवारी  राञी रेशनिंगचा तांदूळ काळ्या बाजाराचा आहे, हे माहिती असूनही गोविंद विद्यासागर वाघमारे, राहुल भगवान घोरपडे व त्याचा अनोळखी साथीदारांसह साठा करून ट्रक ने वाहतूक करत असताना नगर तालुका पोलिसांनी कारवाई केली. 

5. माळीवाडा बस स्थानकातून महिलेकडील दागिन्यांची चोरी 
अहमदनगर शहरातील माळीवाडा बस स्थानकातून पुण्याच्या एका महिलेकडील  १ लाख ९१ हजार ५०० सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाल्याची घटना घडलीये याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय शहरात चोरीच्या घटना वाढतच असून पोलीस प्रशासन  चोरीच्या घटनांवर नियंत्रण मिळवण्यात अपयशी ठरत असल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जातीय . 


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *