Breaking News

1/breakingnews/recent

शहराची खबरबात - महाराजांचा इतिहास प्रेरणादायी- अजित कोतकर

No comments

       News24सह्याद्री महाराजांचा इतिहास प्रेरणादायी- अजित कोतकर....पहा शहराची खबरबात मध्ये


TOP HEADLINES

1. सेक्सटॉर्शन च्या माध्यमातून पैसे उकळण्याचा नवीन प्रकार समोर

बातमी पत्राच्या सुरवातीलाच एक महत्वपूर्ण बातमी आहे  आता सायबर टोळ्यांनी सेक्सटॉर्शन च्या माध्यमातून पैसे उकळण्याचा नवीन प्रकार सुरू केला आहे. मागील काही दिवसात नगर जिल्ह्यात अनेक जण या नवीन प्रकाराचे बळी ठरले आहेत.गेल्या दोन महिन्यात नगर येथील सायबर पोलीस ठाण्यात तब्बल तीस जणांनी संपर्क करून त्यांच्या सोबत घडलेला हा प्रकार सांगितला आहे. 

2. जिल्हा सहकारी बँकेचे साठी शांततेत मतदान
अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या 4 जागांसाठीआज मतदान झाले दुपारी बारा वाजेपर्यंत नगर व कर्जत विविध कार्यकारी सेवा संस्था मतदारसंघात 95 टक्के मतदान झाले होते तर पारनेर मध्ये 11 टक्के मतदान झाले नगर सोसायटी मतदार संघासाठी साडेबारा वाजेपर्यंत शंभर टक्के मतदान झाले पारनेर नगर सोसायटी मतदार संघात उदय शेळके व शिवाजी कर्डिले यांचा विजय निश्चित मानला जात आहे. 

3. महाराजांचा इतिहास प्रेरणादायी- अजित कोतकर 
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त केडगाव येथे विविध सामाजिक उपक्रम राबवून शिवजयंती साजरी केली सर्व युवकांनी एकत्र येऊन सामाजिक बांधिलकीतून गरजूवंतांना फळांचे वाटप केले. 

4. पंजाब मधील यशाचा नगर मध्ये जल्लोष
नुकत्याच पंजाब मध्ये पार पडलेल्या सात मनपाच्या निवडणुकांमध्ये सहा ठिकाणी काँग्रेसला निर्विवाद सत्ता मिळाली मोगा मनपामध्ये कॉंग्रेसने सर्वाधिक जागा मिळवत मोठा पक्ष म्हणून स्थान मिळवले दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन सुरू असताना पार पडलेल्या निवडणुकीत मतदारांनी केंद्रातील सत्ताधारी भाजपला जोरदार चपराक दिली आहे. 

तरच महिलांवरचे अत्याचार थांबतील- अंजली वल्लाकट्टी 
छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकरी व जनतेसाठी संघर्ष करत रयतेचे राज्य उभारले महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना कडक शासन केले त्यामुळे स्वराज्यात महिला सुरक्षित होत्या आताच्या काळात नराधमांना कोणाचाच धाक नसल्याने महिलांवरील अत्याचारात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे . 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *