Breaking News

1/breakingnews/recent

30 डिसेंबर सह्याद्री सुपरफास्ट

No comments

   News24सह्याद्री -  धान्यापासून इथेनॉल तयार करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी...पहा देशातील,राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा


TOP HEADLINES

1. मकरविलक्कू उत्सवासाठी आज खुलं होणार शबरीमला मंदिर

केरळचे प्रसिध्द शबरीमला मंदिर बुधवारपासून खुलं करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरवर्षी साजऱ्या केल्या जाणाऱ्या मकरविलक्कू या उत्सवासाठी आज संध्याकाळी पाच वाजता हे मंदिर खुलं करण्यात येत असून भाविकांना उद्यापासून दर्शनाचा लाभ घेता येणार आहे. त्रावणकोर देवसोम बोर्डने या संबंधी एक निवेदन प्रसिध्द केलं असून 31 डिसेंबर ते 19 जानेवारीपर्यंत भाविकांना भगवान अयप्पाच्या दर्शनासाठी हे मंदिर खुलं राहणार असल्याचं सांगितलं आहे. त्यानंतर 20 जानेवारीला हे मंदिर पुन्हा बंद करण्यात येणार आहे.
-------
2. धान्यापासून इथेनॉल तयार करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेट कमिटीच्या बैठकीत इथेनॉलच्या उत्पादनासंबंधी मोठा निर्णय झालाय. कॅबिनेटनं इथेनॉलचं उत्पादनावर सबसिडी वाढवण्यास मंजुरी दिली आहे. सरकार इथेनॉल उत्पादनावर कंपन्यांना व्याज सबसिडी देणार आहे. त्याशिवाय धान्यापासून इथेनॉल तयार करण्याच्या प्रस्तावालाही मंजुरी दिलीय. आता उसाशिवाय तांदूळ, मका, गव्हापासून इथेनॉल तयार केलं जाऊ शकतं.
---------
3. हरियाणात भाजपाला जोरदार धक्का
कर्नाटसोबतच भाजपा सत्ताधारी असलेल्या हरियाणामध्येही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या. शेतकरी आंदोलनाने पंजाब, हरियाणातील वातावरण तापलेले असतानाच नगरपालिका आणि नगरपरिषदांच्या निवडणुका झाल्याने याचा थेट फटका भाजपाला बसल्याचे दिसत आहे. यामुळे दोन नगरपरिषदा, तीन नगरपालिका भाजपाला गमवाव्या लागल्या आहेत.
-----
4. सज्ञान जोडपे एकत्र राहू शकते
तरुणाचे लग्नाचे वय झाले नसेल, मात्र तो कायद्याने सज्ञान असेल, तरी त्याला सज्ञान जोडीदारासोबत राहण्याचा अधिकार आहे, असं पंजाब आणि हरियाणा हायकोर्टाने स्पष्ट केलं. भारतात तरुणांना वयाच्या 21 व्या, तर तरुणींना 18 व्या वर्षी विवाह करण्याचा अधिकार प्राप्त होतो. परंतु हायकोर्टाच्या निर्णयामुळे लग्नाचं वय न गाठलेल्या, मात्र कायद्याने सज्ञान म्हणजेच 18 वर्षांवरीलव्यक्तींना लिव्ह इनमध्ये राहण्याचा अधिकार मिळाला आहे.  
-------
5. शेतकऱ्यांसोबत कृषी आणि रेल्वेमंत्र्यांंचं जेवण
मोदी सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची आज सातवी चर्चेची फेरी सुरु आहे. शेतकऱ्यांनी केंद्र सरकारला कायद्यात दुरुस्त नको, तर कायदा रद्द करुन हमी भावाचा कायदा करण्याची मागणी केलीय. तसेच याच अटीवर चर्चेसाठी तयारी दाखवलीय. त्यामुळे या बैठकीत नेमकं काय होणार याकडे आंदोलनकारी शेतकऱ्यांसह देशाचं लक्ष आहे. त्यातच कोणत्याही परिस्थिती कायदा मागे घेणार नाही अशी भाषा करणाऱ्या मोदी सरकारचीही बॉडी लँग्वेज बदललेली दिसत आहे. मात्र आज केंद्राचे दोन मंत्र्यांनी शेतकऱ्यांनी आणलेलं जेवण करत काहीशी नरमाईची भूमिका दाखवली आहे  
------
6. शिवसेना यूपीमध्ये पंचायत निवडणुका लढवणार
उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीपूर्वी होणाऱ्या पंचायत निवडणुकीत आम आदमी पार्टी (आप) आणिएआयएमआयएम पक्षानंतर आता शिवसेनाही आपले उमेदवार रिंगणात उतरवणार आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी सेमीफायनल मानल्या जाणार्‍या पंचायत निवडणुका मार्च-एप्रिलमध्ये होणार आहेत. यासाठी अनेक राजकीय पक्ष तयारीमध्ये गुंतले आहेत.  
------------
7. केडीएमसीच्या बारावे प्रकल्पात प्लास्टीक पासून इंधन तेलाची निर्मिती
कल्याण डोंबिवली महापालिकेने सीएसआर फंडातून बारावे येथे उभारलेल्या प्रकल्पात प्लास्टीक पासून इंधन तेल तयार करण्यात यश आले आहे. या प्रकल्पाची काल चाचणी घेण्यात आली. पहिल्याच चाचणीत प्रकल्पात प्लास्टीक पासून ८५ लिटर इंधन तेलाची निर्मिती केली आहे. रिसेल व्हॅल्यू नसलेले प्लास्टीक वापरून इंधन तेलाची निर्मिती केली आहे. महापालिकेस सीएसआर फंड प्राप्त झाला होता. महापालिकेने बारावे येथे प्लास्टीक पासून इंधन तेलाचा प्रकल्प उभारला आहे. रुद्र इन्व्हारमेंट सोल्यूशन लिमीटेड आणि कल्याण डोंबिवली महापालिका हा प्रकल्प संयुक्त विद्यमाने चालविणार आहे.  
-------
8. सायरस पुनावाला यांना 'महाराष्ट्र भूषण' द्या; मनसेची मागणी
 सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या माध्यमातून या संस्थेचे संस्थापक सायरस पुनावाला यांनी अनेक रोगांवर लस उपलब्ध करून दिल्या आहेत. आता ही संस्था कोविडवरील लसीचं संशोधन करत आहे. सायरस पुनावाला यांचं हे योगदान लक्षात घेऊन त्यांना राज्य सरकारने महाराष्ट्र भूषण पुरस्कार द्यावा, अशी मागणी मनसेने केली आहे.  
-------
9. 18 गावे वगळण्याचा वाद टोकाला
कल्याण डोंबिवली महापालिकेतून 18 गावे वगळण्याचा राज्य सरकारच्या निर्णय उच्च न्यायालयाने रद्दबातल ठरविला होता. या प्रकरणी उच्च न्यायालयाच्या निकाला प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सरकार दाद मागू शकते अशी शक्यता व्यक्त केली जात होती. ही शक्यता खरी ठरली आहे. राज्य सरकार आणि कल्याण डोंबिवली महापालिकेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सर्वोच्च न्यायालयात स्पेशल लीव्ह पिटीशन दाखल करण्यात आली आहे.  
--------
10. भारतीय संघाचे माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यांच्या गाडीचा अपघात
भारतीय संघाचे माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यांच्या गाडीला अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात अजहरुद्दीन हे थोडक्यात बचावले आहेत. राजस्थानच्या लालसोट कोटा मेगा हायवेवर हा अपघात झाला आहे. सुरवाल पोलीस स्टेशनजवळ ही घटना घडली.  


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *