Breaking News

1/breakingnews/recent

2 जानेवारी Good Morning सह्याद्री

No comments

News24सह्याद्री - औरंगाबादचं नामांतर तीस वर्षांपूर्वीच झालं - सामना....पहा सकाळच्या ताज्या बातम्यांचे अपडेट


TOP HEADLINES

1. ‘कोव्हिशिल्ड’ला मंजुरी
करोना विषाणू संसर्गाच्या सावटाखाली असलेल्या भारतीयांसाठी चांगली बातमी आहे.
ऑक्सफर्ड- अॅमस्ट्राझेनेका यांनी विकसित केलेल्या आणि सीरम संस्थेने तयार केलेल्या ‘कोव्हिशिल्ड’ या लशीच्या आपत्कालीन वापरास केंद्र सरकारच्या तज्ज्ञ समितीने शुक्रवारी मंजुरी दिल्याचे सूत्रांनी सांगितले. देशभरात आज होणाऱ्या लसीकरणाच्या सराव फेरीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी केंद्रीय औषध मानक नियामक संस्थेच्या तज्ज्ञ समितीची बैठक झाली. या बैठकीत ‘कोव्हिशिल्ड’ लशीच्या आपत्कालीन वापरास तज्ज्ञ समितीने मंजुरी दिली असून आता भारताच्या महाऔषध नियंत्रकांच्या परवानगीची प्रतीक्षा आहे. त्यांनी परवानगी दिल्यानंतर भारतात आपत्कालीन वापरास मंजुरी मिळवणारी ही पहिली लस ठरेल.
------------

2. तोडगा निघाला नाही तर आंदोलन तीव्र करण्याचा शेतकऱ्यांचा इशारा
शेतकरी आंदोलनाचा आज ३८ वा दिवस. आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी देशाच्या राजधानीच्या सीमांवर शेतकऱ्यांकडून आंदोलन सुरु आहे. नववर्षात 4 जानेवारी रोजी केंद्र सरकार आणि शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींमध्ये बैठक होणार आहे. अशातच शेतकरी संघटनांनी 4 जानेवारीपर्यंत आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. शेतकऱ्यांची पुन्हा एकदा 4 जानेवारीला सरकारसोबत चर्चा होणार आहे. या चर्चेत जर आमच्या मागण्यांबाबत जर तोडगा निघाला नाही तर मात्र आम्हाला कठोर पावलं उचलावी लागतील असं म्हणत शेतकऱ्यांनी आता आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.
---------
3. भीमा-कोरेगावची जागा ताब्यात घेण्यासाठी न्यायालयीन लढा लढणार - ऊर्जामंत्री
 
“महाविकास आघाडी सरकार भीमा-कोरेगावातील विजयस्तंभ या प्रेरणास्थळाचा विकास करण्याचा अधिकाधिक प्रयत्न करेल. त्यासाठी या स्थळाचा ताबा राज्य सरकारकडे येणे गरजेचे आहे. त्यासंदर्भातील कायदेशीर लढाई मुंबई उच्च न्यायालयात सुरू आहे. ही लढाई अधिक प्रभावीपणे लढता यावी म्हणून सरकारच्यावतीने विशेष वकील नेमण्यासाठी, राज्य सरकारने आपली बाजू प्रभावीपणे दिलेल्या तारखांना न चुकवता मांडली जावी, यासाठी सरकारमधील एक मंत्री म्हणून आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा एक सच्चा अनुयायी म्हणून मी पूर्ण ताकदीनिशी प्रयत्न करणार आहे,” असं आश्वासन ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी भीमा कोरेगाव येथे दिले  
--------------

4. औरंगाबादचं नामांतर तीस वर्षांपूर्वीच झालं - सामना

‘शिवसेनेने भूमिका बदललेलीच नाही. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी तीस वर्षांपूर्वीच जाहीरपणे औरंगाबादचे संभाजीनगर केले. हे नामांतर लोकांनी स्वीकारले. प्रश्न राहिला सरकारी कागदपत्रांचा. त्यावरही लवकरच दुरुस्ती होईल. भाजपास त्याची काळजी नको,’ असे म्हणत शिवसेनेने आपले मुखपत्र सामनामधून भाजपवर घणाघाती टीका केली. तसेच महाराष्ट्राचे सरकार किमान समान कार्यक्रमाच्या अंमलबजावणीशी बांधील असल्याचंही शिवसेनेने म्हटलं आहे.  
-------
5. नविन वर्षाच्या सुरुवातीला पँनल 12 च्या नगरसेविकेने घेतली स्वच्छतेची शपथ  
उल्हासनगर महानगरपालिका पँनल क्रमांक 12 च्या नगरसेविका सविता तोरणे रगडे यांनी नवीन वर्षाच स्वागत पॅनेलमध्ये स्वच्छता अभियान घेऊन विभाग स्वच्छ ठेवण्याची शपथ घेतली. यावेळी उल्हासनगर महानगरपालिकेचे सॅनिटरी इन्स्पेंंक्टर सुरेश बिनिवाले,संतोष यादव तसेच पॅनल12 मधील सर्व मुकादम व सफाई कर्मचारी यांच्या सहकार्याने स्वछता अभियान राबविण्यात आले. प्रशासन आपलं कर्तव्य बजावत आहे.नागरिकांनी देखील असाच प्रतिसाद देत रहावे आपण सर्व मिळुन आपला प्रभाग आपल्या घराप्रमाणे स्वच्छ व सुंदर ठेवण्याची शपथ नगरसेविका सविता तोरणे रगडे,समाजसेवक शीवाजी रगडे व विभागातील जनतेने घेतली.
-------
6. घरफोडी करणाऱ्या गुन्हेगारास मानपाडा पोलिसांनी केले जेरबंद 
डोंबिवली मध्ये गेल्या काहि दिवसात घरफोडीचे प्रमाण वाढले होते. मानपाडा पोलीस हद्दीतील आढवली - ढोकळी गावामध्ये घरफोडी झाल्याचा प्रकार नुकताच घडला होता. यामध्ये कोणत्याही प्रकारचा पुरावा नसताना  मानपाडा पोलिस स्टेशनचे हवालदार व पोलीस उपनिरीक्षक यांनी वरिष्ठांच्या सहकार्याने सीसीटीव्हीच्या आधारे सराईत चोरट्यास अटक केली. त्याकडे चोकशी केली असता आरोपी हा इगतपुरी वरून कल्याण- डोंबिवली मध्ये भाजीविक्री करण्यास येत असत व अजून अश्याच प्रकारच्या चार घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले असून यामध्ये एकूण ६ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्धेमाल त्याच्याकडून हस्तगत करण्यात आला असल्याचेपोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी सांगितले
----------
7. मसाल्याच्या गोदामातून १५ हजाराची चिल्लर चोरीला
डोंबिवली मधील सुनीलनगर येथील मच्छिंद्र कुटे यांच्या मसाल्याच्या गोदामात चोरीची घटना घडली. चोरट्याने गोदामाचे शटर उचकटून गोदामातील १५ हजार रुपयांची चिल्लर आणि ५ हजार रुपये किंमतीचे पापड, लोणचे, मसाल्याची पाकिटे चोरुन नेली आहेत. ही चोरीची घटना सीसीटिव्हीमध्ये कैद झाली आहे.  याप्रकरणी रामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सीसीटिव्ही फुटेजच्या आधारे पोलिस चोराचा शोध घेत आहेत
---------
8. मोकाट कठाळ्या कुत्र्याचा बंदोबस्त लावा - नगरसेवक पवार 
जालना जिल्ह्यातील देहेडकरवाडीत परिसरात मोकाट कठाळ्या व कुत्राचा बदोबस्त लावा अशी मागणी शिवसेना गटनेते ,नगरसेवक विजय पवार यांनी जालना नगर परिषदेकडे केली आहे. रिक्षा ड्रायव्हर धन्यकुमार हिरप यांच्यावर कठाळ्या कुत्र्याने हल्ला केला. त्यात त्यांच्या कंबरेला पायाला मार लागला हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून त्यानं एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हिरप यांच्या नातेवाइकानी याबद्दल नागरदेवाक विजय पवार यांच्याकडे तक्रार केली असता नगरसेवक पवार यांनी या कुत्र्यांचा बंदोबस्त लवकरात लवकर करावा अशी मागणी नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांच्याकडे केली आहे 
---------
9. टोयोटा कडून सर्वात छोटी इलेक्ट्रिक कार लाँच
टोयोटा मोटर कॉर्पोरेशनने C+pod अल्ट्रा कॉम्पॅक्ट बॅटरी इलेक्ट्रिक व्हेईकल लाँच केली आहे. ही कार कॉर्पोरेट युजर्स, लोकल गवर्मेंट आणि इतर कंपन्यांसाठी उपलब्ध केली आहे. टोयोटा कंपनी सध्या Battery Electric Vehicle ला प्रोमोट करण्याचा प्रयत्न करत आहे. यामध्ये नवीन बिझनेस मॉडेल आणि 2022 पर्यंत लाँच होणाऱ्या वाहनांचा समावेश आहे.  
-------
10. जायबंदी उमेशच्या जागी नटराजनचा समावेश
तमिळनाडूचा उदयोन्मुख डावखुरा वेगवान गोलंदाज नटराजनचा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उर्वरित दोन कसोटी सामन्यांसाठी जायबंदी उमेश यादवच्या जागी भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. त्याशिवाय दुखापतीमुळे यापूर्वीच संघाबाहेर गेलेल्या मोहम्मद शमीऐवजी मुंबईकर शार्दूल ठाकूरला संधी देण्यात आली आहे.  



No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *