16 फेब्रुवारी सह्याद्री बुलेटिन
News24सह्याद्री - भाजपच्या मोठ्या आमदाराला राष्ट्रवादीकडून जाहीर ऑफर....जाणून घ्या महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये
1. जीवे मारण्याची धमकी देत सामूहिक बलात्कार
ठाणे ग्रामीणामधये 13 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी पोलिसांनी चार अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेबद्दल तिनं कोणालाही सांगितलं, तर तिच्या पालकांना ठार मारण्याची धमकीही आरोपींनी दिली होती.
2. भाजपच्या मोठ्या आमदाराला राष्ट्रवादीकडून जाहीर ऑफर
एकीकडे राष्ट्रवादीमध्ये इन्कमिंग सुरू आहे तर दुसरीकडे भाजपला एकापाठोपाठ एक धक्के बसत आहे. आता साताऱ्यात सुद्धा भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांना राष्ट्रवादीने मोठी ऑफर दिली आहे.
3. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर झालेल्या भीषण अपघात पाच जणांचा मृत्यू झाला आहे, तर पाच जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये नवी मुंबईतील एकाच कुटुंबातील चार जणांचा समावेश आहे. मुंबईकडे येणाऱ्या मार्गावर खालापूर टोलनजीक फुडमॉलजवळ मध्यरात्री हा भीषण अपघात झाला.
4. आज विठ्ठल-रुक्मिणी विवाहाचा सोहळा
आज वसंत पंचमी विठुरायाच्या विवाहाची तिथी. शेकडो वर्षांपासून ही परंपरा चालत आली आहे. साक्षात देवाचा विवाह असल्याने याला उपस्थित राहण्यासाठी शेकडोच्या संख्येने भाविक येत असतात मात्र कोरोनामुळे यंदा भाविक नसले तरी थेट स्वर्गातील देव या विवाहासाठी उपस्थित असल्याची फुल सजावट केली आहे.
5. टूलकिट प्रकरणाचे धागेदोरे बीडपर्यंत
दिल्लीच्या शेतकरी आंदोलनात 'टूलकिट'चा वापर करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या टूलकिट प्रकरणाचे धागेदोरे बीडपर्यंत असल्याचे पुढे आले आहे. टूलकिट तयार करणाऱ्या तिघांपैकी शंतनू मुळूक बीडचा असल्याचे समोर आले आहे. त्याने अटकपूर्व जामिनासाठी औरंगाबाद खंडपीठात अर्ज केला आहे.
6. देशातील या ४ बँकांचे खासगीकरण होण्याची शक्यता
देशातल्या चार सार्वजनिक बँकांच्या खासगीकरणाच्या हालचाली सुरू झाल्य़ा आहेत. बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, इंडियन ओव्हरसिज बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया या चार बँकांचं खासगीकरण होण्याची शक्यता आहे. या वर्षी यातल्या दोन बँकांचं खासगीकरण होण्याची शक्यता आहे.
7. पॅन नंबरला आधार क्रमांकाशी जोडण्याची अंतिम मुदत 31 मार्च
सध्या पॅन नंबरला आधार क्रमांकाशी जोडण्याची अंतिम मुदत 31 मार्च 2021 आहे. 31 मार्चनंतर, ज्यांचे पॅन आधारशी जोडलले गेले त्यांचे पॅनकार्ड 1 एप्रिल 2021 पासून डिअॅक्टिव्हेट केलं जाईल.पॅनकार्ड बंद झालं तर ते पुन्हा सुरू करण्यासाठी दंड भरावा लागणार आहे . याची शेवटची तारीख 30 जून 2020 होती, जी 31 मार्च 2021 पर्यंत वाढवण्यात आली आहे.
8. शेतकऱ्यांनी हायवेवर उभारली स्वत:ची बाजारपेठ
कोरोना काळातील लॉकडाऊनच्या काळात अनेकांचा रोजगार हिरावल्याचे आपण पाहिलं. मात्र नांदेड जिल्ह्यातील वाका इथल्या शेतकऱ्यांनी संकटात संधी निर्माण केल्याचे काम केलंय. वाका गावातील भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचा भाजीपाला कोरोना काळात शहराततील कवडीमोल दराने विकल्या जात होता.
9. भररस्तात एसटी बसच्या चाकाचे नटबोल्ट गायब
रस्त्यावर चालत असताना एसटी बसमधून आवाज आल्यानंतर बस थांबवून जेव्हा बघितलं गेलं, तर बसमधील एका चाकाचे सर्व नटबोल्टच गायब होते. वेळेवर प्रसंग माहिती पडल्याने एक मोठा अपघात टळला आहे. मात्र,
10. विदर्भाला कोरोनाचा विळखा
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. विदर्भात कोरोनाचा विळखा पुन्हा घट्ट होताना दिसत आहे. काल नागपुरात 498 कोरोनाबाधित वाढले. शहरात तीन आणि ग्रामीणमध्ये एकाचा कोरोनाने बळी घेतला आहे.
No comments
Post a Comment