27 डिसेंबर Good Morning सह्याद्री
News24सह्याद्री - 'किसान रेल्वे' ला पंतप्रधान दाखवणार हिरवा झेंडा...पहा सकाळच्या ताज्या बातम्यांचे अपडेट
TOP HEADLINES
1. मोदी सरकारला धक्क्यावर धक्के सुरुच
भाजपप्रणित NDA आणि पर्यायाने केंद्रातील मोदी सरकारला धक्क्यावर धक्के सुरुच आहेत. कारण कृषी कायद्यावरुन आणखी एका मित्रपक्षाने NDA तून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. राजस्थानातील राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टीने भाजपची साथ सोडली आहे. राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्षाचे नेते हनुमान बेनीवाल यांनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देत, हा निर्णय जाहीर केला.
----------
2. शेतकरी संघटना 29 डिसेंबर रोजी सरकारसोबत चर्चेस तयार
2. शेतकरी संघटना 29 डिसेंबर रोजी सरकारसोबत चर्चेस तयार
केंद्र सरकारच्या तीन नवीन कृषी कायद्याविरोधात आंदोलन करणार्या शेतकरी संघटनांनी सरकारशी बोलणी करण्याचा निर्णय घेतला आहे. 29 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता शेतकरी संघटनांनी सरकारबरोबर पुढच्या फेरीतील चर्चेचा प्रस्ताव दिला आहे. मात्र, या चर्चेसंदर्भात शेतकरी संघटनांनी चार अटी सरकारसमोर ठेवल्या आहेत. सरकारने तीनही नवीन कृषी कायदे रद्द करावे, एमएसपीची कायदेशीर हमी द्यावी, वीज बिलाच्या मसुद्यात बदल करावा ,पराली कायद्यातून शेतकऱ्यांना वगळावे ह्या चार अटी शेतकऱ्यांनी सरकारपुढे ठेवल्या आहेत.
---------
3. 'किसान रेल्वे' ला पंतप्रधान दाखवणार हिरवा झेंडापंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील 100 व्या किसान रेल्वेला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. 28 डिसेंबर रोजी संध्याकाळी 4.30 वाजता हा कार्यक्रम व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून पार पडणार आहे. या प्रसंगी पंतप्रधानांसोबत रेल्वे मंत्री पियूष गोयल आणि कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्रातील सांगोला ते पश्चिम बंगालमधील शालिमार या दरम्यान धावणारी ही किसान रेल्वे कृषी उत्पादनांच्या वाहतुकीसाठी गेम चेंजर ठरणार आहे असा दावा केंद्र सरकारकडून करण्यात येत आहे. ही किसान रेल्वे देशातील 100 वी किसान रेल्वे असणार आहे.
-------
ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यात मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवरदुसरा कसोटी सामना खेळण्यात येतोय. हा बॉक्सिंग डे कसोटी सामना आहे. टीम इंडियाचा नियमित कर्णधार विराट कोहली भारतात परतला आहे. त्यामुळे मराठमोळ्या अजिंक्य रहाणेकडे या कसोटी मालिकेत नेतृत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. रहाणेने या दुसऱ्या कसोटीत आपल्या नेतृत्वाची चूणुक दाखवून दिली. तसेच रहाणेने योग्य वेळी योग्य निर्णय घेतले. रहाणेने आपल्याकडे असलेल्या गोलंदाजांचा योग्य आणि गरजेनुसार वापर केला. त्यामुळे पहिल्याच दिवशी टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाला ऑल आऊट करण्यास यश आले. 4. सीबीएसई दहावी,बारावी बोर्डाचे वेळापत्रक ३१ डिसेंबर रोजी जाहीर होणार
सीबीएसई 10वी आणि 12 वी बोर्डाच्या परीक्षेच्या तारखा 31 डिसेंबरला जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल यांनी दिली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन मार्च महिन्यात सुरु झाले. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या परीक्षांवरही परिणाम झाला. त्यामुळे सीबीएसई 10 वी आणि 12 बोर्डाचे पेपर नेमके कधी होणार? याबाबत विद्यार्थ्याना प्रश्न पडला होता. मात्र यावर शिक्षणमंत्री पोखरीयाल यांनी 31 डिसेंबरला याबाबतच वेळापत्रक जाहीर करणार असल्याचं सांगितलं आहे
---------
5. आगामी निवडणुकीत भाजपला यश मिळणारच - केंद्रीय राज्यमंत्री दानवे
प्रत्येक घटनेचे अवलोकन करून भारतीय जनता पक्ष वाटचाल करीत असून व्यक्तिगत आधारित पक्ष म्हणून भाजपा नसून सामुहिक नेतृत्वाचा पक्ष असल्यामुळे महाराष्ट्रात तीन विचार धारेचे वेगवेगळे पक्ष एकत्रित येऊन भाजपा द्वेषाने निवडणुकीमध्ये मैदानात उभे राहिले तरी जनता जनार्धनाचा आशीर्वाद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कुशल नेतृत्व व कार्यकर्त्यांच्या बळावर आगामी महानगर पालिका,नगर पालिका निवडणुकीमध्ये भाजपाला यश मिळणारच असे प्रतिपादन केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांनी केले. पक्ष व पंतप्रधान मोदी त्यांच्या कामांचा प्रचार- प्रसार तसेच पक्षाने राम मंदिर निर्माणाचे काम,कलम ३७० रद्द केले आहे. हि कामे सर्व सामान्यांपर्यंत पोहचविण्याचे काम कार्यकर्त्यांनी करावे असे ही आवाहन रावसाहेब दानवे यांनी केले.दानवे हे खाजगी कार्यक्रमासाठी अकोल्यात आले होते . यावेळी ते बोलत होते. -----------
6. कोरोना विरुध्द लढाई; विद्यार्थ्यांची पथ नाटयाद्वारे जनजागृती
उल्हासनगर कँम्प.नंबर पाच येथील स्वामी हंसमुनि महाविद्यालयाच्या एन.सी.सी.च्या विद्यार्थ्यांनी पथनाट्यद्वारे कोरोनाच्या विरुध्द लढायचे कसे यासंदर्भात शहरातील विविध विभागात जावुन जनजागृती केली. आणी कोरोना काळात मुत्त्यु पावलेल्या नागरिकांना श्रध्दांजली वाहण्यात आली. उल्हासनगर सिंधु एज्युकेशन सोसायटी,एस.एच.एम.महाविद्यालय, अतुल्य विचार फाउंडेशन,वान्या फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हया कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हिललाईन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मोहन खंदारे,व उल्हासनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम, जेष्ट समाजसेविका रेखा ठाकुर,आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
----------
7. चंद्रपूरमध्ये भाजपचे डिजिटल सदस्य नोंदणी पर्व सुरू
भारतरत्न पंतप्रधान स्व .अटलबिहारी बाजपेयी यांच्या 95 व्या जयंतीचे औचित्य साधून चंद्रपूर भारतीय जनता पार्टीच्या वतीने डिजिटल सदस्य नोंदणी पर्वाला सुरवात करण्यात आली या अभियानाचा शुभारंभ आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आला. बाबू पेठ स्थित माजी पंतप्रधान अटलबिहारी स्टेडियम येथील अटलजींच्या पुतळ्याला आदरांजली स्वरूप माल्यार्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. महाराष्ट्रात पहिल्यांदाच डिजिटल सदस्य नोंदणीपर्वाला सुरवात होत आहे. 25 जानेवारी पर्यंत अटल डिजिटल भाजप सदस्य नोंदणी अभियान राबविले जाणार आहे .
भारतरत्न पंतप्रधान स्व .अटलबिहारी बाजपेयी यांच्या 95 व्या जयंतीचे औचित्य साधून चंद्रपूर भारतीय जनता पार्टीच्या वतीने डिजिटल सदस्य नोंदणी पर्वाला सुरवात करण्यात आली या अभियानाचा शुभारंभ आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आला. बाबू पेठ स्थित माजी पंतप्रधान अटलबिहारी स्टेडियम येथील अटलजींच्या पुतळ्याला आदरांजली स्वरूप माल्यार्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. महाराष्ट्रात पहिल्यांदाच डिजिटल सदस्य नोंदणीपर्वाला सुरवात होत आहे. 25 जानेवारी पर्यंत अटल डिजिटल भाजप सदस्य नोंदणी अभियान राबविले जाणार आहे .
------------
8. डोंबिवलीत प्रथमच महिलांसाठी विशेष वैद्यकीय शिबीर
शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व जिल्हा सामान्य रुग्णालय ठाणे तसेच खासदार डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या वतीने ठाणे जिल्ह्यात प्रथमच डोंबिवलीतील कोपरगाव येथील ज्येष्ठ नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी महिलांसाठी हिमोग्लोबिन चेकअप शिबिर ठेवले होते. काही दिवसांपूर्वी कोपरगाव येथे रक्तदान शिबीर भरविले होते. त्यावेळी काही महिला रक्तदान करण्यासाठी आल्या होत्या. मात्र हिमोग्लोबिनची कमतरता असल्याने त्यांना रक्तदान करता आले नाही. म्हणून मी यावर उपाययोजना करावी म्हणून खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्याशी चर्चा केली. खासदार डॉ.शिंदे यांनी महिलांसाठी विशेष वैद्यकीय शिबीर भरविण्यास सांगितले. त्यांच्या सल्ल्यानुसार शिबीर भरविले असून या शिबिरात अनेक महिलांनी शरीरातील हिमोग्लोबिनची तपासणी करून घेतल्याची माहिती रमेश म्हात्रे यांनी दिली.
------------
9. गोळीबारात एकाचा मृत्यू
अकोला एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील बाभूळगाव जहाँगीर नजीक सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास अकोल्यातील खोलेश्वर येथील गोपाल हनुमान प्रसाद अग्रवाल यांच्यावर दोन अज्ञात दुचाकीस्वारांनी पाठलाग करीत दोन गोळ्या झाडल्या यामध्ये त्यांचा घटनास्थळी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे . या हल्लेखोरांनी गोळीबार करून रोकड घेऊन घटना स्थळाहून पोबारा केला. या घटनेची माहिती मिळताच एमआय डि सी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून परिस्थितीजन्य पुरावे गोळा करणे सुरु केले आहे. यावेळी गोपाल अग्रवाल यांची नेमकी हत्या का व कशासाठी झाली त्या मागील कारण अद्यापही अस्पष्ट आहे. पोलिसांनी अज्ञात हल्लेखोरां विरोधात गुन्हे दाखल करून तपास सुरु केला आहे.
----------
10. कर्णधार अजिंक्य रहाणेचे बॉक्सिंग डे कसोटीत दमदार नेतृत्त्व
No comments
Post a Comment