मोठी बातमी - अण्णा हजारे करणार दिल्लीला आंदोलन
News24सह्याद्री -
राजधानी दिल्लीच्या सीमेवर गेल्या २५ दिवसांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरुच आहे. नव्या कृषी कायद्यांना या शेतकऱ्यांचा विरोध आहे. याबाबत सरकारकडून तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र, अद्याप सरकारला त्यावर यश मिळालेल नाही. अण्णा हजारे यांनी दिल्लीतील शेतकरी आंदोलनात सहभागी होत, आंदोलनाला पाठिंबा द्यावा अशी मागणी करण्यात येत आहे. त्यासाठी दिल्लीतील 6 शेतकऱ्यांचे एक शिष्टमंडळ अण्णांच्या भेटीसाठी राळेगणसिद्धीत दाखल झाले आहे. या शिष्टमंडळा बरोबर अण्णा हजारे यांनी चर्चा केली , त्यांनतर अण्णांनी पत्रकारांशी संवाद साधला आहे.
अण्णा हजारे यांनी लोकपाल कायद्यासाठी दिल्ली येथे मोठे आंदोलन आणि उपोषण केले होते या आंदोलनाला देशभरातून उस्फुर्त असा प्रतिसाद मिळला होता दरम्यान आता जवळपास २४ दिवसापासून सुरु असणाऱ्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला अण्णांनी स्वतः पाठिंबा दरसवला आहे ,त्याचबरोबर सरकराने आंदोलनासाठी जागा उपलब्ध करून दिली तर दिल्लीला आंदोलन करणार असल्याचे अण्णांनी स्पष्ट केले आहे , यामुळे आता शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला वेगळ वळण मिळण्याची शक्यता आहे
No comments
Post a Comment