Breaking News

1/breakingnews/recent

मोठी बातमी - भाजपचे खासदार सुजय विखे भाजपमध्ये अस्वस्थ

No comments

     News24सह्याद्री - लोकसभेच्या निवडणुकीवेळी नाही नाही म्हणत अखेर सुजय विखे यांनी भाजपात प्रवेश करून लोकसभा निवडणूक लढवली आणि ते भाजप काढून खासदार झाले मात्र सुजय विखे यांचा स्वभाव परखड असल्याने अनेक वेळा त्यांची वक्तव्य वादग्रस्त झाली होती. कोरोना संसर्ग पसरू नये म्हणून त्यांनी लॉकडाऊनची मागणी केली होती. त्या वरून जिल्हा प्रशासनावावर सुजय विखे यांनी थेट आरोप लावले होते. खासदारांना मिळणारा  निधी असेल अथवा काही शासकीय योजना असतील या वरून विखे यांनी सरकार आणि प्रशासनाला लक्ष केले होते मात्र आता त्यांनी थेट पक्षात चालू असलेल्या घुस्मटि बद्दल जाहीर वक्तव्य केले आहे. होय  मी बंडोखर आहे माझा स्वभाव वेगळा आहे मी कोणत्याच पक्षात ऍडजेस्ट होत नाही मात्र माझ्या सहनशीलतेचा अंत पाहू नका असं इशाराच त्यांनी दिला आहे.

 अत्यंत परखड शब्दात सुजय विखे यांनी आपल्याच पक्षातील पधाधिकाऱयांना सुनावले आहे . सुजय विखे पाटील नेमक्या कोणत्या घुसमटीत पक्षात वावरत आहेत आणि कोणते दुःख ते सहन करत आहेत याची चर्चा आता त्यांच्या कार्यकर्त्यांसह भाजप मध्ये चांगलीच झडू लागलीय.  सुजय विखे यांनी पहिल्यांदाच पक्ष बदलला असला तरी विखे घराणे हे काँग्रेस शिवसेना पुन्हा काँग्रेस आणि आता भाजप असा प्रवास करून आलेले आहे. त्या मुले पुन्हा स्वगृही जाण्याचे हे संकेत तर नाही ना अशी चर्चा कार्यकर्त्यां मध्ये घडू लागली आहे.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *