Breaking News

1/breakingnews/recent

मोठी बातमी - भाऊ कोरगावकर आणि विक्रम राठोड यांची शिष्टाई यशस्वी; शिवसेनेतील वाद संपुष्टात

No comments

  News24सह्याद्री - 


नगर शहर शिवसेनेतील गटबाजीला अखेर पुर्णविराम मिळाला आहे. संपर्क प्रमुख भाऊ कोरगावकर आणि  विक्रम राठोड यांच्या पुढाकारातून हा वाद संपुष्टात आला आहे. जिल्हा प्रमुख प्रा. शशिकांत गाडे आणि शहर प्रमुख दिलीप सातपुते यांनीही याकामी पुढाकार घेतला. सावेडी उपनगरातील एका मंगल कार्यालयात झालेल्या बैठकीत शिवसेनेच्या सदस्य नोंदणीबाबत आढावा झाला आणि त्याच बैठकीत गटतटावर यापुढे कोणीही कोणतीही प्रतिक्रिया आणि पत्रकबाजी करणार नाही असा सज्जड दमच भरला गेला.

शिवसेनेतील पक्षसंघटनेची शिस्त सर्वांनी पाळावी असे आवाहन संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर आणि जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांनी केले. त्यास सर्वांनीच प्रतिसाद दिला.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *