Breaking News

1/breakingnews/recent

मोठी बातमी - शिवाजी कर्डिले रात्री अजित पवारांच्या पाया का पडले?

No comments

 News24सह्याद्री - 


माजी खासदार दादा पाटील शेकळे कृषी उत्पन्न बाजार समितीचा कारभार स्वच्छ असल्याचा गवगवा बाजार समिती सत्ताधार्‍यांकडून केला जात आहे. बाजार समितीचा कारभार स्वच्छ आहे, तर मग माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अंधारात पाय का धरले, असा सवाल नगर तालुका महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केेला. दरम्यान, बाजार समितीची चौकशी थांबविण्यासाठीच ज्या पक्षावर टीका केली त्याच पक्षाच्या नेत्यांचे पाय धरण्याची वेळ आली असल्याचा टोलाही यावेळी लगावला.

कार्ले म्हणाले, पीएफ बाबत बाजार समितीच्या कर्मचार्‍यांच्या अनेक तक्रारी आहेत. योग्य वेळी पुरावे बाहेर काढू. कुठल्या जागा विकल्या, कोणी कुठे अतिक्रमण केले हे समोरासमोर येऊन सांगू. बाजार समितीचा कारभार स्वच्छ आहे तर कर्डिले यांनी राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अंधारात पाय का धरले, असा सवाल कार्ले, हराळ यांनी केला. दुसुंगे म्हणाले, बाजार समितीत मोठ्या प्रमाणात गैरकारभार सुरु असून मतदारांनी चोरांच्या हातात बाजार समिती दिल्याचा आरोप केला. शेतकर्‍यांना देशोधडीला लावण्याचे काम कर्डिले यांनी केले असल्याचे ते म्हणाले.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *