Breaking News

1/breakingnews/recent

27 फेब्रुवारी सह्याद्री वेगवान आढावा

No comments

   News24सह्याद्री -  मुख्यमंत्र्यांकडून 'मराठी भाषा गौरव दिना'च्या शुभेच्छा...पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा


TOP HEADLINES


1. मोदी, शहा यांच्या सूचनेनुसार
बंगालमध्ये आठ टप्पे?

पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या निवडणुकीसाठी आठ टप्प्यांत मतदान घेण्यात येणार असल्याचे शुक्रवारी निवडणूक आयोगाने जाहीर केले, त्यावर राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. 

2. सुरतमध्ये महिलेचा पतीविरोधात आक्रमक पवित्रा  
गुजरातच्या सुरतमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेने आपल्या पतीच्या दारू पिण्याच्या त्रासाला कंटाळून एक मोठे पाऊल उचलले आहे. महिलेने भावासोबत मिळून नवऱ्यासोबत केलेल्या कृत्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या महिलेने स्वतःच्या पतीला दोरीच्या सहाय्याने टेम्पोच्या मागे बांधले. यानंतर जवळपास एक किलोमीटरपर्यंत त्याला फरफटत नेले आहे. 

3. गोडसे समर्थकाचा काँग्रेसमध्ये प्रवेश
मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर पालिकेचे नगरसेवक आणि हिंदू महासभेचे नेते बाबूलाल चौरसिया यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. सन २०१७ मध्ये नथुराम गोडसेच्या प्रतीमेचे उद्घाटन करणाऱ्यांमध्ये बाबूलाल चौरसिया यांचा सक्रीय सहभाग होता. 

4. मुख्यमंत्र्यांकडून 'मराठी भाषा गौरव दिना'च्या शुभेच्छा
कुसुमाग्रज जयंतीनिमित्ताने मराठी गौरव दिन साजरा केला जात असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कुसुमाग्रजांना अभिवादन करत जनतेला मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा दिल्या. 'मी मराठी, माझी मराठी!' बाणा जपू या!,' असे आवाहन करत मुख्यमंत्री म्हणाले. 


5. इंग्लंडला मोठा धक्का

पाहुण्या इंग्लंड संघाला तिसऱ्या कसोटीत लाजीरवाण्या पराभवाचा सामना करावा लागलाय.. अहमदाबाद कसोटीत टीम इंडियानं १० विकेट्स राखून दणदणीत विजय मिळवला आणि मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली. या पराभवामुळे इंग्लंडचा आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमधून पत्ता कट झाला. त्यात त्यांना शनिवारी आणखी एक झटका बसला. 


6. आर्थिक सेवा या विषयावर मोदींचे वेबिनार

करोनामुळे देशाची अर्थव्यवस्था घसरत असताना बँकांनी उद्योगांची कर्जाची गरज  भागवावी, तसेच नवोद्योगांसाठी सुलभ आर्थिक साधने उपलब्ध करून द्यावीत, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. खासगी क्षेत्राला पाठबळ देण्याचा सरकारचा प्रयत्न असला तरी सार्वजनिक क्षेत्राचे अस्तित्व बँकिंग व विमा क्षेत्रात गरिबांसाठी आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.


7. क्रिकेट स्पर्धेसाठी चक्क मेंढा, बोकड, कोंबडय़ांची बक्षिसे

वाळवा तालुक्यातील एका मंडळाने आयोजित केलेल्या क्रिकेट स्पर्धेतील विजेत्यांसाठी चक्क मेंढा, बोकड, देशी कोंबडय़ा, अंडी अशा बक्षिसांची घोषणा केली आहे. वाळवा तालुक्यातील बोरगावच्या साथीदार ग्रुपच्या वतीने क्रिकेट स्पर्धाचे आयोजन करण्यात  आलं आहे. 


8. अंबानींच्या बंगल्याबाहेर एक महिना रेकी

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर शस्त्रास्त्राने भरलेली कार सापडल्याने एकच खळबळ उडाल्यानंतर पोलिसांनी कसून तपास सुरू केला आहे. पोलिसांनी अंबानींच्या अँटालिया बंगल्याबाहेरचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. मोर आली आहे.

9. चित्रा वाघ अडचणीत

भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण चांगलेच लावून धरले आहे. प्रकरणात आवाज उठवणाऱ्या भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किशोर वाघ यांच्याकडे बेहिशोबी संपत्ती असल्याचा आरोप करण्यात आला आहे.  लाच प्रकरणाच्या पार्श्वभूमीवरच 1 डिसेंबर 2006 ते 5 जुलै 2016 या सेवा कालावधीतील किशोर वाघ यांच्या संपत्तीची ACB कडून खुली चौकशीही लावण्यात आली होती.

10. कोरोनामुळे पिफ चित्रपट महोत्सव लांबणीवर

पुण्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव म्हणजेच पिफ पुढे ढकलण्यात आला आहे. नव्या निर्णयानुसार 4 मार्चपासून सुरू होणाऱ्या चित्रपट महोत्सवाचे उद्धाटन 11 मार्चला होणार आहे. पिफ चित्रपट महोत्सव 11 ते 18 मार्च या कालावधीत असणार आहे. 


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *