Breaking News

1/breakingnews/recent

27 फेब्रुवारी Good Morning सह्याद्री

No comments

 News24सह्याद्री - शाळेतील २९९ विद्यार्थ्यांना कोरोना....पहा सकाळच्या ताज्या बातम्यांचे अपडेट



TOP HEADLINES

1. नवोद्योगांसाठी सुलभ आर्थिक साधने उपलब्ध करावीत : मोदी
करोनामुळे देशाची अर्थव्यवस्था घसरत असताना बँकांनी उद्योगांची कर्जाची गरज  भागवावी, तसेच नवोद्योगांसाठी सुलभ आर्थिक साधने उपलब्ध करून द्यावीत, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. खासगी क्षेत्राला पाठबळ देण्याचा सरकारचा प्रयत्न असला तरी सार्वजनिक क्षेत्राचे अस्तित्व बँकिंग व विमा क्षेत्रात गरिबांसाठी आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.

2. संजय राठोड यांची गच्छंती अटळ !
पूजा चव्हाण हिच्या संशयास्पद मृत्यूचे प्रकरण विधिमंडळाच्या सोमवारपासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात त्रासदायक ठरू शकते, हे लक्षात घेऊनच वनमंत्री संजय राठोड यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, असा सूर सत्ताधारी महाविकास आघाडीमध्ये आहे. 

3. पुणे-सातारा महामार्गावर बनावट पावत्यांआधारे टोलवसुली

पुणे-सातारा महामार्गावर आनेवाडी आणि खेड-शिवापूर टोलनाक्यावर बनावट पावत्यांद्वारे टोलवसुली केली जात असल्याचा प्रकार शुक्रवारी उघडकीस आला. गेल्या ४२ दिवसांपासून या दोन्ही नाक्यावरील संगणक ‘हॅक’ करून रात्री बारा ते पहाटे तीन वाजेपर्यंत बनावट पावत्यांद्वारे टोलवसुली सुरू होती. 

4. बनावट करोना अहवालाद्वारे धनप्राप्ती

व्यक्तीच्या मर्जीने करोनाचे बनावट अहवाल तयार करून विम्याची रक्कम लाटण्याचे प्रकार अमरावती जिल्ह्य़ात समोर आले आहेत. याच टोळीशी संबंधित एका विमा एजंटची ध्वनिफीत सर्वत्र प्रसारित झाल्याने या कथित गैरव्यवहार प्रकरणाची पाळेमुळे खणून काढण्याचे आव्हान आता जिल्हा प्रशासनासमोर आहे.

5विक्रमगडमध्ये ४०० नागरिक वीज जोडणीच्या प्रतीक्षेत
विक्रमगड  कासा : एकीकडे वीज देयक भरा म्हणून महावितरण आवाहन करत आहे. तर दुसरीकडे वीज जोडणीकडे आलेल्या अर्जांकडे कंपनीचे दुर्लक्ष होत आहे. विक्रमगड तालुक्यातील ४०० नागरिकांनी वीज जोडणी मिळावी म्हणून अर्ज केले सोबत आगाऊ रक्कमही भरली आहे.

6. ‘मोदी, शहा यांच्या सूचनेनुसार बंगालमध्ये आठ टप्पे?’

पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या निवडणुकीसाठी आठ टप्प्यांत मतदान घेण्यात येणार असल्याचे शुक्रवारी निवडणूक आयोगाने जाहीर केले, त्यावर राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. भाजपच्या निवडणूक प्रचाराचे व्यवस्थापन योग्य पद्धतीने व्हावे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या सूचनेवरून मतदानाच्या तारखा घोषित करण्यात आल्या असाव्यात,असा संशय ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केला आहे.

7. चंद्रपुरात बांबू संशोधन प्रशिक्षण केंद्राच्या आगप्रकरणी विजय वडेट्टीवार आक्रमक
गेल्या काही दिवसांपासून राज्यात आगीच्या घटना वाढत आहेत. चंद्रपूरच्या बांबू संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राची इमारत काल लागलेल्या आगीत राख झाली. आज या ठिकाणी चंद्रपूरचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी भेट देऊन स्थितीची पाहणी केली. चंद्रपूरच्या बांबू संशोधन प्रशिक्षण केंद्र आगीची सर्वंकष चौकशी करण्याचे आदेश मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवारांनी दिलेत.

8. देगाव शाळेतील 229 विद्यार्थ्यांना कोरोना
आरोग्य यंत्रणेला काळजी टाकणाऱ्या वाशिम जिल्ह्याच्या रिसोड तालुक्यातील देगाव येथील शाळेत आतापर्यंत तीन वेळा आरोग्य तपासणी करण्यात आलीय. देगाव शाळेच्या वसतिगृहात 24 फेब्रुवारी रोजी 229 विद्यार्थ्यांना कोरोना संसर्ग झाल्याचं स्पष्ट झाल्यानंतर आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्यात. 

9. नागपुरात कडक निर्बंधामुळे दोन दिवस दारूची दुकानं बंद
गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता आता नागपुरात कठोर नियम लागू करण्यात येणार आहेत. येत्या शनिवार आणि रविवारी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद असणार आहेत. त्यामुळेच नागपुरात दोन दिवस बाजारपेठा बंद राहणार आहेत
 
10. भाजपची ठाण्यात पोस्टरबाजी
गेल्या काही दिवसांपासून राज्यावर कोरोनाचं संकट आहे. त्यामुळे जोरदार लसीकरणालाही सुरुवात झालीय. सध्या सरकारनं केवळ फ्रंटलाईन वर्कर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना लस उपलब्ध करून दिलीय. परंतु ठाण्यात महापौरांनाही लस देण्यात आली. त्यामुळे ठाण्याच्या राजकीय वर्तुळात गहजब माजलाय.
  

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *