३० ऑक्टोबर - शहराची खबरबात
News24सह्याद्री : जनसेवेची पावती वसंत राठोड यांना मिळाली आहे : भैय्या गंधे...पहा नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्या शहराची खबरबात..!
TOP HEADLINES
जनसेवेची पावती वसंत राठोड यांना मिळाली आहे : भैय्या गंधे
भिंगार छावणी परिषदेच्या उपाध्यक्षपदी वसंत राठोड यांची झालेली नियुक्ती ही त्यांनी पक्षाच्या माध्यमातून केलेल्या चांगल्या कामाचीच पावती आहे...मात्र काहींनी या नियुक्तीला अक्षेप घेणे हे चुकीचे आहे. छावणी परिषदेने योग्यप्रकारे अभ्यास करून केलेल्या या नियुक्तीत कोणतीही वशिलेबाजी झालेली नाहीये असे मी शपथेने सांगतो. आता भिंगारच्या सात नगरसेवकांचे प्रतिनिधित्व एकटे वसंत राठोड करत आहे. त्यामुळे त्यांनी सर्व पक्षांना, नागरिकांना बरोबर घेत भिंगार वासियांचे प्रश्न सोडवावीत. कार्यकर्त्यांनी कोणत्याही पदाची अपेक्षा न ठेवता जनता जनार्दनाची सेवा करावी, पक्ष कायम काम करणाऱ्यांच्या मागे उभा असतो, असे प्रतिपादन भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष नगरसेवक भैय्या गंधे यांनी केले. केंद्र सरकारने भिंगार छावणी परिषदेच्या उपाध्यक्षपदी भाजपाचे वसंत राठोड यांची नियुक्ती केली आहे. छावणी परिषदेचे अध्यक्ष ब्रिगेडियर विजय राणा यांनी वसंत राठोड यांना उपाध्यक्षपदाची शपथ देवून वसंत राठोड यांचा सत्कार केला. त्यानंतर कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या आवारात झालेल्या सत्कार समारंभात भैय्या गंधे बोलत होते. यावेळी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विद्याधर पवार, श्रीमती सरोज गांधी, महिला आघाडीच्या अध्यक्षा ज्योत्स्ना मुंगी, किशोर कटोरे, लक्ष्मिकांत तिवारी, ब्रिजेश लाड आदींसह विविध क्षेत्रातिल नागरिक उपस्थित होते.
YOU MAY ALSO LIKE
Maharashtra
No comments
Post a Comment