Special report - या मुलांचे बलिदान कोणीही विसरू शकणार नाही
News24सह्याद्री - या मुलांचे बलिदान कोणीही विसरू शकणार नाही.....पहा सह्याद्री special रिपोर्ट
प्रेक्षक हो मागील दीड वर्षांपासून आपण सगळेच कोरोना सारख्या महामारीला सामोरे जात आहोत, सगळं काही या महामारीच्या काळात बंद होत, शाळा महाविद्यालये देखील अनेक दिवसांपासून बंद आहेत, शाळा बंद असल्यामुळे एकीकडे काही विद्यार्थी घरी बोर झाले आहेत तर दुसरीकडे काही विद्यार्थ्यांना शाळा बंद असल्याने आनंद झाल्याचे चित्र बघायला मिळालं आहे. सध्या सोशल मीडियावर २ लहान चिमुकल्यांचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होताना पाहायला मिळत आहे. व्हिडिओमधील हि मुले कोरोनाशी लढण्यासाठी आपल्या शिक्षणाचा हि बळी दयायला तयार असल्याचे सांगत आहेत. आणि गमतीची गोष्ट म्हणजे अगदी सात वर्षे जरी शाळा बंद कराव्या लागल्या तरी हे बलिदान आम्ही देऊ असं हे लहानगे म्हणत आहेत. या मुलांच्या भाबडेपणावर आणि अभिनयावर लोक खूपच खूष झाल्याचं पाहायला मिळाला आहे.आणि या व्हिडीओ चा लोक आनंद घेतायेत.
No comments
Post a Comment