Special report - बहुदा कासवालाही कळलंय अनलॉक झालं
News24सह्याद्री - बहुदा कासवालाही कळलंय अनलॉक झालं.....पहा सह्याद्री special रिपोर्ट
सोशल मीडियावर रोजच हजारो व्हिडीओ चर्चेचा विषय ठरतात. समाजमाध्यमांवर चर्चेत येणारे जास्तीत जास्त व्हिडीओ हे प्राण्यांशी निगडीत असतात. प्राण्यांच्या वेगवेगळ्या करामती, त्यांनी केलेली अफलातून कामगिरी यामुळे हे व्हिडीओ व्हायरल होतात. सध्या एका कासवाचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांना हसू फुटलं असून त्यांनी मजेदार कमेंट्स केल्या आहेत. कासवाचा अंघोळ करतानाचा राजेशाही थाट तसेच कासवाने मारलेले ठुमके हे पाहण्यासारखे आहेत.
या व्हिडीओमध्ये एक कासव पाण्याच्या नळाखाली अंघोळ करतो आहे. अंघोळ करताना तो चांगलाच खुश झाल्याचे दिसतेय. पाण्याच्या प्रवाहाखाली थांबल्यामुळे त्याला थंडगार वाटत असावे. याच कारणामुळे हा कासव हर्षोल्हासाने डान्स करतो आहे. पाण्याच्या नळाखाली उभं राहून तो मजेदार ठुमके मारतोय. या कासवाचा हा उत्स्फूर्त डान्स नेटकऱ्यांना चांगलाच भावला आहे.
No comments
Post a Comment