Special report - सुनेने कोरोना बाधित सासऱ्याला नेले पाठीवरून दवाखाण्यात
News24सह्याद्री - सुनेने कोरोना बाधित सासऱ्याला नेले पाठीवरून दवाखाण्यात.....पहा सह्याद्री special रिपोर्ट
सोशल मीडियावर आसाममधील एका महिलेचा फोटो व्हायरल होतोय. त्यामध्ये ती महिला आपल्या कोरोना पॉझिटिव्ह सासऱ्याला पाठीवर घेऊन दोन किलोमीटरची पायपीट करताना दिसत आहे. एवढं करुनही तिला आपल्या सासऱ्याचा जीव वाचवता आला नाही.देशातील कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेनेही भयानक वास्तव समोर आणलंय. कोरोनाचा सर्वाधिक फटका हा गरीबांना बसला आहे या काळात अनेकांच्यातील माणुसकीचा प्रत्यय आला तर अनेकांनी माणुसकी सोडल्याचं दिसून आलंय. आसाम राज्यातील नगांव या गावातील निहारिका दास हि महिला स्वत: कोरोना पॉझिटिव्ह असूनदेखील या महिलेला तिच्या कोरोना पॉझिटिव्ह सासऱ्याला रुग्णालयात दाखल करण्यासाठी पायपीट करावी लागल्याची धक्कादायक घटना घडलीये . निहारिका दास या महिलेच्या सासऱ्याला कोरोनाचे निदान झाल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यासाठी कोणी मदत करत नव्हते त्यामुळे शेवटी या महिलेने तिच्या सासऱ्याला पाठीवर घेऊन तब्बल दोन किलोमीटरची पायपीट केली. त्यानंतर सासऱ्यासोबत तिलाही रुग्णालयात दाखल व्हावं लागलं.
No comments
Post a Comment