Breaking News

1/breakingnews/recent

Special report - आर.टी.ओ पळतोय ट्रक ड्राईव्हरमागे

No comments

      News24सह्याद्री - आर.टी.ओ पळतोय ट्रक ड्राईव्हरमागे.....पहा सह्याद्री special रिपोर्ट





एक ट्रक ड्रायव्हर पुढे पळतोय आणि त्याच्या मागे एक खाकी वर्दी घातलेला अधिकारी पळतोय असच काहीसे दृश्य आपण पहात असलेल्या व्हिडीओ मध्ये दिसतंय आधी हे दृश्य पोलीस चोराच्या मागे लागले असल्याचं वाटत मात्र हा खेळच वेगळा आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय या व्हिडीओत जो अधिकारी आहे तो परिवहन विभागाचा म्हणजेच आरटीओ अधिकारी आहे आणि जो पुढे पळतोय तो एक ट्रक ड्रायव्हर आहे या ट्रक ड्रायव्हर ने कोणताच गुन्हा केलेला नाही पण त्याने एक व्हिडिओ शूट केला त्या मुळे हा आरटीओ अधीकारी त्याच्या मागे लागलेला आहे.

 राजस्थानच्या नागोर येथील हायवे वरील ही घटना आहे ट्रक ड्रायव्हर नागोर ला जात असताना मधेच हायवे वर एक आरटीओ अधिकारी पैसे वसूल करत होता एक कर्मचारी रोड वर उभा करून अधिकारी आरामात गाडीत बसून होता आणि खुलेआम वसुली चालू होती मात्र या चाणाक्ष ट्रक ड्रायव्हर ने त्याच्या या हप्तेखोरांची शूटिंग काढली आणि हे लक्षात येताच आरटीओ अधिकारी तो व्हिडीओ डिलीट कर म्हणत ट्रक ड्रायव्हरच्या मागे पळत होता मात्र ड्रायव्हरने हा व्हिडिओ आपल्या फेसबुक अकाऊंट द्वारे पोस्ट करून थेट अधिकाऱ्यांनाच टेक केल्याने या अधिकाऱ्यावर सध्या चौकशीची कुऱ्हाड कोसळली आहे मात्र हा व्हिडिओ पाहून नक्कीच हसू आवरत नाही कारण भ्रष्टाचारी अधिकारी ट्रक ड्रायव्हरच्या मागे पळतानाच दृश्य अनेकांनी व्हिडीओ द्वारे पाहिले आहे अनेक ट्रक ड्रायव्हरला त्रास देणाऱ्या अशा अधिकाऱ्यांना असंच उघड केले पाहिजे अशी प्रतिक्रिया आता या व्हिडीओ वर येत आहे.


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *