शहराची खबरबात - महापौरपदासाठी काँग्रेसचा दुहेरी खेळ
News24सह्याद्री - महापौरपदासाठी काँग्रेसचा दुहेरी खेळ... पहा शहराची खबरबात मध्ये
TOP HEADLINES
1. महापौरपदासाठी काँग्रेसचा दुहेरी खेळ.
आता महापौरपदासाठी नगरमध्ये निवडणुकीचे वातावरण तापू लागले आहे. गुंड, नौटंकीखोर असे शब्द वापरून रोज राष्ट्रवादीवर एकीकडे टीका करायची आणि दुसऱ्या बाजूने आम्हाला महापौरपदासाठी मदत देण्याची याचना राष्ट्रवादीच्या नेत्यांकडे करायची,असा दुहेरी खेळ नगर शहरात काँग्रेसने सुरू केलाय. राष्ट्रवादीने हि बघू,ठरवू श्रेष्टींना सांगा, असं सांगून बोळवण केलीय.
२. बूथ हॉस्पिटल सर्वसामान्यांसाठी ठरले आरोग्य मंदिर
बॉम्बे टिन चॅलेंज या मुंबईतील सेवाभावी संस्थेच्या वतीने अहमदनगर मधील बूथ हॉस्पिटल ला सात लाख रुपयांच्या आरोग्य विषयक महत्वाची उपकरने आणि यंत्रसामुग्री आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते प्रदान करण्यात अली आहेत. यावेळीकोरोना सारख्या महामारीने संपूर्ण जगाला विळखा घातलेला असताना हजारो सर्वसामान्य रुग्णांचे प्राण वाचवण्याचे अनमोल कार्य बूथ हॉस्पिटल ने केलं असून हॉस्पिटल प्रशासन, डॉक्टर, नर्सेस, कर्मचारी यांच्या विषयी नगरकरांच्या मनात कायम कृतज्ञतेची भावना आहे.
३. जिल्हा परिषदेत उभारली जाणार शिवशक राजदंड स्वराज्य गुढी
जूनला शिवराज्याभिषेक दिनी अहमदनगर जिल्हा परिषदेत शिवशक राजदंड स्वराज्य गुढी उभारण्यात येणार आहे. यासह जिल्हा परिषद स्थापनेला 60 वर्षे पुर्ण झाल्याबद्दल जिल्हा परिषद हिरक महोत्सव शुभांरभाचे औचित्य साधून जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्याकडील महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियांनातंर्गत जिल्ह्यातील महिला स्वयंसहाय्यता गटांच्या उत्पादनांचे ऑनलाईन शॉपिंगसाठी साईज्योती ‘ई’ मार्केट प्लेसचा शुभारंभ देखील करण्यात येणार आहे.
४. नगर शहरात लसीचे सोळाशे डोस
मागील ३ दिवसांपासून बंद असलेले अहमदनगर शहरातील लसीकरण केंद्रे आज पासून सुरू झाले. उद्या 5जूनला प्रत्येक केंद्रावर 200 चा लॉट वितरित करण्यात येणार आहे.तसेच पंचेचाळीस वर्षापूढील नागरिक आणि फ्रन्टलाइन वर्कर्स यांना कोविशील्ड लसीचा 84 दिवसानंतरचा दुसरा डोस दिला जाणार आहे.
५. नगरसेवक कवडे यांचे आयुक्तांना निवेदन
गेल्या वर्षभरापासून कोरोनामुळे अनेकांचे बळी गेले आहेत, तर अनेकांना हॉस्पिटल चा मोठा खर्च सहन करावा लागलाय. कोरोनावर प्रभावी ठरणारी लस सरकार नागरिकांना देत आहे.
No comments
Post a Comment