Breaking News

1/breakingnews/recent

मोठी बातमी - विश्वस्त उत्तमराव शेळके यांच्या जनहित याचिकेवर निर्णय

No comments

   News24सह्याद्री -




२०१६ नंतर साई  संधी देऊनही राज्य शासनाने शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानचे  विश्वस्त मंडळ अद्यापही न नेमल्याची हायकोर्टाने गंभीर दखल घेतलीये. नुकत्याच झालेल्या सुनावणीत औरंगाबाद खंडपीठाने  संस्थानवर पूर्णवेळ विश्वस्त मंडळ नेमण्यासाठी राज्य सरकारला शेवटची संधी दिली. दोन आठवड्यांत शासनाने निर्णय न घेतल्यास अवमानाची  कार्यवाही करण्यात येईल असे  न्या. एस. व्ही. गंगापूरवाला आणि न्या. एस. डी. कुलकर्णी यांच्या खंडपीठाने ठणकावले.  शिर्डी येथील माजी विश्वस्त उत्तमराव शेळके यांनी साईबाबा संस्थान  येथे नवीन विश्वस्त मंडळ नेमण्यासाठी जनहित याचिका दाखल केली होती.  शेळके यांच्यावतीने अॅड प्रज्ञा तळेकर यांनी युक्तीवाद केला. या मार्च महिन्यात झालेल्या सुनावणीत राज्य सरकारने दोन महिन्यांत विश्वस्त समिती स्थापन करण्याची घोषणा केली होती. 

आता त्याला खूप कालावधी उलटला असल्यामुळे  राज्य सरकारने लवकरात लवकर विश्वस्त मंडळाची नेमणूक करावी अशी बाजू अॅड. तळेकर यांनी मांडलीये. सरकारी वकिलांनी कोरोना परिस्थितीत मंडळाच्या  नेमणुकीसाठी  वेळ वाढवून देण्याची विनंती केली. पण न्यायालयाने येत्या दोन आठवड्यांत विश्वस्त मंडळ नेमण्याचे आदेश दिलेत आता राज्यसरकार या बाबत काय निर्णय घेणार याकडे शिर्डीकरांचे लक्ष लागून आहे. मात्र हि नेमणूक सरकादरबारी होत असल्याने सत्ताधारी पक्षातील निकटवर्तीयांना या विश्वस्त मंडळात संधी मिळू शकते त्यामुळे राजकीय पक्षच्या नेत्यांसह उदयोजक आणि सामाजिक कार्यकर्तायनच्या मुंबई वाऱ्या सुरु होण्याची शक्यता आहे 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *