मोठी बातमी - संगमनेरातील प्रवरा नदीपात्रात झोपून अनोखे आंदोलन
News24सह्याद्री -
संगमनेर प्रवरा नदी पात्रातून अवैधरित्या वाळू उपसली जात आहे त्यामुळे पर्यावरणाला धोका निर्माण झालाय हा वाळूचा उपसा थांबविण्याची मागणी नागरिकांनी करत गंगामाई घाट परिसरातील नदीपात्रात झोपून नागरिकांनी आंदोलन केले कासारा दुमाला ते संगमनेर खुर्द येथील मोठ्या पुलापर्यंत रात्रंदिवस अवैधरित्या वाळू उपसली जात आहे त्यामुळे नदी परिसरातील पुरातन घाट मंदीरांना धोका निर्माण झालाय त्यामुळे येथून वाळू उपसा बंद करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे मात्र याकडे कुणीही लक्ष द्यायला तयार नाही म्हणून वाळूउपसा न थांबवल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला.
No comments
Post a Comment