16 जुन सह्याद्री वेगवान आढावा
News24सह्याद्री - १० वी आणि ११ वीच्या गुणांवरुन ठरणार बारावीचे मार्क्स...पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा
TOP HEADLINES
1. १० वी आणि ११ वीच्या गुणांवरुन ठरणार बारावीचे मार्क्स
कोरोनामुळे विद्यार्थ्यांच्या परीक्षा घ्यायच्या की नाहीत, यावर बराच काळ चर्चा झाल्यानंतर प्रकरण कोर्टात गेलं आणि अखेर परीक्षा रद्द करण्यात आल्या; मात्र त्यानंतर आता विद्यार्थ्यांचं मूल्यांकन कशाच्या आधारावर करायचं, या मुद्द्यावरच्या चर्चेने वेग घेतला आहे. तरीही त्यातून अद्याप ठोस काही मार्ग निघालेला नाही. 10वी आणि 11वीची अंतिम परीक्षा आणि बारावीची पूर्वपरीक्षा यामधल्या मार्क्सनुसार 30:30:40 अशा फॉर्म्युल्याने सीबीएसईच्या 12वीच्या विद्यार्थ्यांना मार्क्स दिले जाण्याची शक्यता आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनने बारावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनासाठी मार्ग सुचवण्याकरिता 13 सदस्यांची समिती नेमली आहे. ही समिती 30:30:40 या फॉर्म्युलाची शिफारस करण्याची शक्यता आहे.
No comments
Post a Comment