Breaking News

1/breakingnews/recent

सह्याद्री Breaking - 16 जून पासून मराठा आंदोलन पेटणार

No comments

           News24सह्याद्री - 




आता मराठा समाजाकडे आंदोलनाशिवाय पर्याय राहिला नसून शाहू महाराजांच्या समाधी सोहळा पासून पहिला मोर्चा निघेल असा इशारा संभाजीराजे छत्रपती यांनी आज रायगडावरून दिला आहे यावेळी बोलताना त्यांनी राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांना इशारा दिला असून मराठा समाजाला आतातरी न्याय द्या अन्यथा पुढील काळात मराठा समाज आक्रमक होईल असेही त्यांनी सांगितले आज 348 वा  शिवराज्याभिषेक दिन रायगडावर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सुवर्ण गुणांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिषेक करण्यात आला यावेळी बोलताना छत्रपती संभाजीराजे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे मागील सरकार आणि आत्ताच सरकार हे फक्त एकमेकांकडे बोट दाखवून मराठ्यांची चेष्टा करत आहे छत्रपती शाहू महाराजांनी बहुजन समाजातील सर्वांना आरक्षण दिले मग मराठा समाजाला आरक्षण का नको असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे 16 जून पासून होणाऱ्या आंदोलनात सर्व पक्षीय नेत्यांनी सामील व्हावं असेही त्यांनी सांगितला असून मागण्या मान्य न झाल्यास पुणे ते मुंबई असा लॉंग मार्च ही काढण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *