मोठी बातमी - आमदार निलेश लंके यांना मनसे नेते अमित ठाकरे म्हणाले, ‘कळलं का? ऐकताय ना लंके-चंके-बंके’
News24सह्याद्री -
आमदार निलेश लंके यांना मनसे नेते अमित ठाकरे म्हणाले, ‘कळलं का? ऐकताय ना लंके- चंके- बंके’
मनसेचे पारनेर तालुका उपाध्यक्ष अविनाश पवार यांना राष्ट्रवादीचे पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी केलेल्या दमदाटीसह शिवीगाळीची दखल थेट मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी घेतलीय! अमित ठाकरे यांनी राज ठाकरे यांचा जुना व्हीडीओ फेसबुकवर टॅग केलाय.
या व्हीडीओच्या खाली त्यांनी आमदार निलेश लंके यांना उद्देशून ... कळलं का? ऐकताय ना लंके- चंके- बंके असं टॅग करून त्याला महाराष्ट्र सैनिक असं हॅशटॅग केलं आहे. मनसे पदाधिकार्याला आमदार लंके यांनी केलेली दमदाटी आणि अबु्रनुकसानीपोटी एक कोटीची बजावलेली नोटीस मनसेने गांभिर्याने घेतल्याचेच यातून दिसते. अमित ठाकरे यांनी आमदार लंके यांना उद्देशून ‘ कळलं का? ऐकताय ना लंके- चंके- बंके’ अशा शब्दांत संताप व्यक्त केलाय! आता या प्रकरणात आमदार निलेश लंके अथवा त्यांचे समर्थक काय भूमिका घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
No comments
Post a Comment