मोठी बातमी - जिल्ह्यात उद्यापासून काय राहणार चालू; काय बंद?
News24सह्याद्री -
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल जनसंवाद साधताना काही जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथील करण्याबाबत सूतोवाच केले होते. आणि याबाबत जिल्हाधिकारी आणि महानगर पालिकेचे आयुक्त यांनी स्थानिक पातळीवर निर्णय घ्यावा असेही सांगितले होते. या पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्ह्यात १ जून पासून सकाळी ७ ते ११ आणि सकाळी ७ ते २ या वेळेत दुकाने उघडण्याची मुभा प्रशासनाने दिलीये. त्यामुळे गेल्या २ महिन्यापासून बंद असलेली बाजारपेठ पुन्हा उघडणार आहे मात्र दुकाने उघडल्यानंतर कोविड संसर्ग होऊ नये म्हणून [प्रशासनाने दिलेले नियम बंधनकारक ठेवलेले आहेत. नगर जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या जरी कमी होत असली तरी नागरिकांनी सतर्कता घेणे गरजेचे आहे असे आवाहन जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी केलंय उद्यापासून काय सुरु होणार काय बंद राहणार पाहुयात ग्राफिक्स च्या माध्यमातून.
No comments
Post a Comment