जिल्ह्याची खबरबात - वादळाने भिंत पडून चिमुरड्याचा मृत्यू
News24सह्याद्री - वादळाने भिंत पडून चिमुरड्याचा मृत्यू....पहा जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्या
TOP HEADLINES
1. शेवगावकरांना मोठा दिलासा
आज सोमवार दिनांक 31 रोजी कोरोना बाधित रुग्ण संख्या 78 आसुन नागरिकांना गर्दिच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे व प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहनही तालुका आरोग्य अधिकारी डॉ सलमा हिराणी यांनी केले.
2. आ. रोहित पवारांनी दिली आज पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मगावी भेट
चौंडी येथील वाडा आणि महादेव मंदिर परिसरातील पायऱ्यांना अहिल्यादेवी घाट म्हणून ओळखले जाते. गेल्या १५० हून अधिक वर्षांपासून हा घाट मातीत बुजला होता. स्थानिक आ. रोहित पवार यांच्या माध्यमातून बीजीएस व नाम फाऊंडेशनच्या सहकार्याने त्यावरील माती काढून दुरुस्ती करण्यात आली. आज ऱविवारी आ. रोहित पवार यांनी जयंतीच्या पूर्वसंध्येला हा घाट धुवून स्वच्छ करून पूजा केली.
3. आरक्षणाच्या संदर्भात मराठा समाज जी भूमिका घेईल त्याला आमचा पाठिंबा - आ. विखे
आरक्षणाच्या संदर्भात मराठा समाज जी भूमिका घेईल त्याला पक्षीय भूमिका आड येवू न देता आमचा पाठिंबा असेल अशी ग्वाही भाजपाचे नेते आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी मराठा समाजातील संघटनाच्या प्रतिनिधीशी संवाद साधताना दिली. आरक्षणाबद्दल काय म्हणाले आ. विखे.
4. शिर्डीच्या साई मंदिरालाही कोरोनाचा आर्थिक फटका
गेल्या वर्षभरापासून सुरु असलेल्या कोरोना महामारीमुळे अनेक उद्योग व्यवसायांना मोठा फटका बसला आहे. यातच कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्यातील धार्मिक स्थळे देखील बंद ठेवण्यात आली होती. अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी साई मंदिराला मोठा फटका बसला आहे. किती कोटीचा फटका बसला ?
No comments
Post a Comment