मोठी बातमी - कोरोना काळात आरोग्य कर्मचारी वाढदिवसात मग्न
News24सह्याद्री -
महानगरपालिकेचा आरोग्य विभाग या ना त्या कारणामुळे नेहमीच वादग्रस्त ठरलेला आहे सध्याच्या कोरोना संसर्ग च्या काळात आरोग्य विभागाने चांगले काम केले असले तरी काही वेळा हा विभाग वादग्रस्त ठरत आहे. काही निष्काळजी लोकांमुळे या विभागाला नेहमीच टीकेला समोर जावे लागते काही दिवसापूर्वी आरोग्य अधिकारी यांचा वाढदिवस वादग्रस्त ठरला होता. याबाबत महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यास आयुक्तांनी कारणे दाखवा नोटीसही बजावली होती. हे प्रकरण ताजे असतानाच मुकुंद नगर मधील आरोग्य केंद्रावर एका आरोग्य कर्मचार्याचा वाढदिवस साजरा करण्यात आला वाढदिवस साजरा करणे हे वागवे नाही. मात्र सध्याची कोरोना परिस्थिती पाहता सार्वजनिक ठिकाणी हा कार्यक्रम करणे किती योग्य आहे.
प्रशासनाने मनाई केली असतानाही आरोग्य केंद्रात सोशल डिस्टन्स पालन न करता, मास्क न वापरता वाढदिवस साजरा करून आरोग्य कर्मचाऱ्यांनी नागरिकांना कोणता संदेश दिलेला आहे. इतर वेळी नागरिकांना मास्क लावला नाही, किंवा सोशल डिस्टनस पालन केले नाही. तर महानगरपालिकेचा दक्षता विभाग दंड करतो, मग या आरोग्य कर्मचाऱ्यांवर आता काय कारवाई होणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. महानगर पालिका कर्मचाऱ्यांवर कोणाचा वचकच राहिला नाही का? असाही प्रश्न या कार्यक्रमामुळे समोर येत आहे. सध्याची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. नागरिक कुठेतरी या कोरणा संसर्गाच्या प्रकोपापासून सावरत असताना आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी असे कार्यक्रम करणे. किती योग्य आहे असा सवालही आता नागरिक उपस्थित करू लागले आहेत.
No comments
Post a Comment