Breaking News

1/breakingnews/recent

मोठी बातमी - आश्चर्यजनक ! भरदाव वेगाने जाणाऱ्या रेल्वे खाली जाऊनही 'ती' वाचली..

No comments

 News24सह्याद्री -



दादर रेल्वे स्टेशन वरील एक सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. एक महिला आरोपी पळून जाण्याच्या प्रयत्नात रेल्वे ट्रॅकवर पडली. त्यावेळी एका पोलीस अधिकाऱ्यानं जीवाची बाजी लावत या महिलेचा जीव वाचवला आहे. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलं आहे. पाहुयात नेमका कसा घडला हा प्रकार दादर रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर आरोपी असलेल्या एका महिलेला पोलीस घेऊन जात होते. त्यावेळी आरोपी महिलेनं समोरून येणारी लोकल ट्रेन पाहून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पळण्याचा प्रयत्न करताना तिनं पोलिसांचा हात झटकून प्लॅटफॉर्मवर येणाऱ्या ट्रेनसमोर उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र तिचा हा प्रयत्न फसला. अचानक उडी मारल्यानं तिचा तोल गेला आणि ती रेल्वे ट्रॅकवर पडली. त्याचवेळी सतर्क असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन घनवट यांनी कमालीचं शौर्य दाखवून सावधगिरीनं ट्रेन येण्यापूर्वीच महिला आरोपीला ट्रॅकवरून बाजूला केलं.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *