मोठी बातमी - जिल्ह्यातील ठोक किराणा, कांदा मार्केट आणि भुसार दुकानांसाठी नियमावली जाहीर
News24सह्याद्री -
जिल्ह्यातील लॉकडाऊन दि. 15 जून पर्यंत वाढवण्यात आला मात्र नगर शहरातील जनता कर्फ्यूमुळे ठोक किराणा व भुसार मालाची दुकाने बंद असलेली ही दुकाने सुरू करण्याबाबत जिल्हा प्रशासन व महानगर पालिका प्रशासन यांच्यात चर्चा होऊन शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती, आडते बाजार, दाळ मंडई येथील जीवनावश्यक वस्तू व अन्न धान्य व्यापार सुरू करण्याबाबत सांगोपांग चर्चा करण्यात आली.या चर्चा दरम्यान अत्यावश्यक सेवांतर्गत येत असणार्या किराणा दुकानांमध्ये मालाचा पुरवठा सुरळीतपणे होणे कामी विक्रीच्या किराणा दुकानांसह ठोक विक्रेत्यांना परवानगी देण्याबाबत सर्व सदस्यांचे एकमत झाले. यानुसार जिल्ह्यातील ठोक किराणा, भुसार दुकानांसाठी नियमावली जाहीर करून सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. हि दुकाने सात ते अकरा या वेळेत सुरू होणार आहे. भुसार शेतमालाला सोबतच कांद्याचे व्यापारी ही याठिकाणी सुरू होणार आहे.
रविवारी मात्र कडक लॉकडाऊन असणार आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीचे भुसार विभाग आडते बाजार डाळ मंडई येथील जीवनावश्यक वस्तू तसेच अन्नधान्य व्यापार सुरू करणे संदर्भात दिलेल्या पत्राची चर्चा त्यात झाली तसेच डी डी आर कार्यालयाने 31 मे रोजी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाला पत्र देऊन कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यवहार सुरू करण्याची मागणी केली होती त्याही पत्रावर आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण समितीच्या बैठकीत चर्चा झाली जिल्ह्यातील ठोक विक्रीचा किराणा भुसार दुकाने सोमवार ते शनिवार सकाळी सात ते अकरा या वेळेत सुरू करण्याला परवानगी देण्यात आली आहे शनिवारी अकरा वाजे नंतर आणि रविवारी ही दुकाने पूर्णतः बंद असणार आहे.
No comments
Post a Comment