Breaking News

1/breakingnews/recent

मोठी बातमी - मनपाच्या स्विकृत नगरसेवकांना औरंगाबाद खंडपीठाची नोटीस

No comments

            News24सह्याद्री -




महानगरपालिकेने स्वीकृत नगरसेवक म्हणून नियुक्त केलेल्या पाचजणांच्या निवडी बेकायदेशीर असून, या नियुक्त्यांमध्ये निकषांचे पालन झालेले नसल्याचा दावा मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल याचिकेत करण्यात आला आहे. नगरचे सामाजिक कार्यकर्ते शाकीर शेख यांनी ही याचिका दाखल केली असून, खंडपीठाने राज्याच्या प्रधान सचिवांसह मनपाचे महापौर,आयुक्त, नवे स्वीकृत नगरसेवक असे मिळून नऊ जणांना नोटीसा काढल्या आहेत. याची सुनावणी 13 जुलैला होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांतील स्वीकृत नगरसेवकांच्या निवडी बाबतच्या शासनाच्या निकषानुसार मनपाने पाचही स्वीकृत नगरसेवकांच्या निवडी केल्या नसल्याचा दावा याचिकाकर्ते शेख यांनी केला आहे. महाराष्ट्र महानगरपालिका  नियम 2012 च्या नियमानुसार पालिका प्रशासनाचे विशेष ज्ञान असणारी व्यक्तींचे नावे  नाम निर्देशित पालिका सदस्याच्या पदासाठी उमेदवार म्हणून नामनिर्देशित केली जाण्यास पात्र आहे असं यावेळी सांगण्यात आलं आहे. या प्रकरणाच्या प्राथमिक सुनावणीत सरकारच्या वतीने अ‍ॅड.एस.जे.कार्लेकर यांनी काम पाहिले. तर ख़ंडपीठाने या प्रकरणी राज्याच्या प्रधान सचिवांसह मनपा आयुक्त,मनपाचे नगरसचिव, महापौर तसेच स्वीकृत नगरसेवक शेळके, आढाव, शेटिया, कातोरे व आंधळे यांना १३  जुलैपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले आहेत. 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *