17 जून सह्याद्री बुलेटिन
News24सह्याद्री - सफाई कामगारांसाठी पालिका मुंबईतच 1121 घरे बांधणार!...जाणून घ्या महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये
TOP HEADLINES
1. "शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र लढले तर.'', संजय राऊतांचं मोठं विधान
राज्यातील काही पक्षांना स्वबळाचं अजीर्ण झालं आहे. भाजपाने स्वबळाचे संकेत आधीच दिले आहेत. आता काँग्रेसचे राज्यातील नेते नाना पटोले हे स्वबळाची भाषा करत आहेत. आता उरले कोण शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस. सध्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने स्वबळाची भाषा केलेली नाही. मात्र राज्यामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन निवडणूक लढले तर राज्यात चमत्कार होईल, असा दावा शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला.
No comments
Post a Comment