मोठी बातमी - थेट पंतप्रधानांच्या बैठकीस अनुपस्थित राहणारा हा अधिकारी पहिला का ?
News24सह्याद्री -
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ सुनील पोखरणा हे पूर्वीपासूनच वादग्रस्त होते. त्यांच्या अशा वृत्तीमुळे अनेक कर्मचारीही त्रस्तआहेत. अशा वागण्यामुळे त्यांच्याविरोधात अनेकवेळा कर्मचाऱ्यांनी आंदोलनेही झाली होती.हे सर्व प्रकरणं ताजे असतांनाच जिल्हा शल्यचिकित्सक पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. ते थेट पंतप्रधानच्या ऑनलाईन बैठकीला अनुपस्थित राहून. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारा राज्यातील काही निवडक जिल्हाधिकाऱ्यांशी कोरोना बाबत माहिती घेण्यासाठी संपर्क साधला होता त्यावेळी नगरमध्ये घेण्यात आलेल्या बैठकीत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सुनील पोखरणा हे उपस्थित न राहिल्याने त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात यावी असा प्रस्ताव जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी आरोग्य विभागाला पाठवला आहे. जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी या बैठकीत चांगल सादरीकरण केल्यामुळे त्यांच मुख्यमंत्र्यांनी कौतुक केलं. मात्र, त्यांना आरोग्य विभागाशी संबंधित माहिती देण्यास अडथळे आले होते.
23 मे रोजी पंतप्रधान मोदी आणि निवडक राज्यांचे मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांशी त्यांनी संवाद साधला या बैठकीत पंतप्रधानांनी कोरोनाबाबत माहिती जाणून घेतली मात्र या बैठकीची पूर्व कल्पना असतानाही जिल्हा शल्य चिकित्सक सुनील पोखरणा या बैठकीला उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे पंतप्रधानांसमोर माहिती सादर करताना अडचणी आल्या. याबाबत जिल्हा शल्य चिकित्सकांना समक्ष विचारणा केली असता तयांनी सांगितलेले कारण हास्यसपद होते त्यामुळे जिल्हाधिकारयांनी त्यांना या बाबत लेखी खुलासा करण्यास सांगितले होते. मात्र लेखी खुलासाही त्यांनी सादर केलेला नाही त्यामुळे ही बाब गंभीर असल्याने त्यांच्यावर शिस्तभंग कारवाई करावी असा प्रस्ताव जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र बसले यांनी आरोग्य विभागाला पाठवला आहे त्यामुळे डॉ सुनील पोखरणा यांच्या समोर अडचणी वाढल्याआहेत.
No comments
Post a Comment