Breaking News

1/breakingnews/recent

१ जुन सह्याद्री टॉप १० न्युज

No comments

 News24सह्याद्री - नवजात ते १२ वर्षे वयोगटातल्या बालकांसाठी रुग्णालय सुरू...पहा  जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप १० मध्ये  




TOP HEADLINES

१. ० ते 12 वर्षे वयोगटातल्या बालकांसाठी रुग्णालय सुरू
मागील वर्षापासून आलेल्या कोरोना  संकटाशी  मुकाबला करण्यासाठी परिपूर्ण आरोग्य व्यवस्था आपल्या देशात आणि राज्यात उपलब्ध नसल्यामुळे त्याची मोठी किंमत मोजावी लागली असून हजारो लाखो नागरिक कोरोनाचे बळी झाले. त्यामुळे भविष्यात सुदृढ आरोग्य व्यवस्था उभी करण्यासाठी जास्तीत जास्त काम करणे गरजेचे आहे सुसज्ज हॉस्पिटल ही काळाची गरज बनली असून श्री लाईफ केअर हॉस्पिटल मुळे कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना होत असलेल्या म्युकॉर्मयकॉसिस सारख्या आजारानं तसेच विविध आजारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांची गैरसोय दूर होणार असल्याचे प्रतिपादन आमदार काळे यांनी केले. 

 २.  जुगार अड्ड्यावर छापा
संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी संगमनेर शहराजवळील संगमनेर खुर्द, मोमीनपुरा, माधव टॉकीज या ठिकाणी जुगार अड्ड्यावर छापा टाकत तीन हजार सहाशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. याप्रकरणी संगमनेर शहर पोलिस ठाण्यांमध्ये हमिद शेख,  पुरुषोत्तम धात्रक, सागर उगले यांच्या विरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. या ठिकाणी कल्याण मटका नावाचा जुगार सुरू होता शहर पोलिसांनी शहरातील अवैध धंद्यांकडे आपला मोर्चा वळवत दररोज कारवाईचा सपाटा सुरूच ठेवलाय यामुळे अवैद्य व्यावसायिकांची मोठी धांदल उडाली आहे.

3. महिलेचा अश्‍लिल फोटो सोशल मीडियावर व्हायरल
राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी-चेडगाव परिसरातील एका महिलेचा अश्‍लील फोटो सोशल मीडियाच्या एका ग्रुपला व्हायरल झाल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.दरम्यान, ब्राम्हणी परिसरातील महिलांचे मेकअपचे साहित्य विक्रीचे दुकान असलेल्या एका तरुणाने हा फोटो व्हायरल केल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरू असून ज्या दिवशी तो फोटो व्हायरल झाला, त्याच दिवसापासून तो तरूण गावातून पसार झाला आहे. त्यामुळे या तरूणावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

4. आरक्षणाच्या संदर्भात आघाडी सरकारमध्ये एकवाक्यता नाही
आरक्षणाच्या संदर्भात आघाडी सरकार एका सुरात बोलत नाही. मंत्र्यांची विधानच विसंगती निर्माण करीत असल्याने मराठा समाजाला आरक्षण देण्याची त्यांची मानसिकता नसल्याचा थेट आरोप भाजपाचे ज्येष्ठ नेते आ राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर समाजाच्या सर्व संघटनांच्या पदाधिकार्‍यांशी विचारविनिमय करून पुढील दिशा ठरविण्यासाठी सोमवारी पाथर्डीमधील विठोबा राजे मंगल कार्यालयात निवडक कार्यकर्त्यांची बैठक बोलावण्यात आली होती त्यावेळी ते बोलत होते.

5. साईबाबांचा शिर्डी मध्ये ऑक्सीजन प्लांट उभारला
रिलायन्स फाऊंडेशनच्या आर्थिक मदतीतून साईबाबांचा शिर्डी मध्ये ऑक्सीजन प्लांट उभारला गेलाय दोन कोटी रुपये खर्चून या प्रकल्पाचा अवघ्या पंधरा दिवसात काम करण्यात आले हवेतील ऑक्सिजन जमा करणारा हा प्रकल्प प्रत्येकाला जीवन दान देणारा ठरतोय ऑक्सिजन अभावी अनेकांना जीव गमवावा लागल्याच्या घटना राज्यामध्ये घडलेल्या आहेत साईबाबांच्या शिर्डीत ही शेकडो रुग्णांवर उपचार करताना ऑक्सीजन साठी येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी साई भक्त अंबानी परिवारानं साथ दिली आहे

6. नाशिक-संगमनेर-पुणे हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचे काम जलदगतीने
 नाशिक-संगमनेर- पुणे हायस्पीड रेल्वेमार्गासाठी केंद्र सरकारने प्रस्तावास मान्यता दिली आहे. या प्रकल्पामुळे नाशिक-पुणे-अहमदनगर जिल्ह्यांच्या विकासाला चालना मिळेल. हा प्रकल्प सुरू करण्यासाठी सर्व मान्यता मिळाल्या असून या द्रुतगती रेल्वे मार्गाचे काम जलदगतीने सुरु करण्यात येत असल्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.

7. सराईत गुन्हेगार संदीप कदमसह तिघांविरूद्ध मोक्का
घाटामध्ये वाहन चालकांना आडवून मारहाण करत लुटणार्‍या सराईत गुन्हेगार संदीप कदम याच्यासह तिघांविरूद्ध मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. टोळी प्रमुख संदीप  कदम, शशिकांत चव्हाण, सोमनाथ  खलाटे असे मोक्का लावलेल्या गुन्हेगारांची नावे आहेत. आरोपीविरूद्ध जिल्हा पोलिसांनी पाठविलेल्या प्रस्तावाला नाशिक विभागाच्या विशेष पोलीस महानिरीक्षक आश्‍वती दोर्जे यांनी परवानगी दिली आहे. या प्रकरणाचा तपास नगर ग्रामीणचे पोलीस उपअधीक्षक अजित पाटील करीत आहे.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *