Breaking News

1/breakingnews/recent

१ जुन सह्याद्री वेगवान आढावा

No comments

News24सह्याद्री - नवजात बाळानं कोरोनावर मिळवला 'अभय'...पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा




TOP HEADLINES

1. शरद पवार-देवेंद्र फडणवीसांच्या भेटीत नेमकी कोणती चर्चा?
विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या सिल्व्हर ओक बंगल्यावर भेट घेऊन २५ मिनिटे चर्चा केली. फडणवीस हे पवार यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी गेले; पण यानिमित्ताने दोघांमध्ये राजकीय गुफ्तगू झाल्याची जोरदार चर्चा आहे.

2. सरकार म्हणजे बरोबरच, ही भूमिका चालणार नाही!
देशात लसीची किंमत एकच असायला हवी. आम्ही सरकार आहोत, म्हणजे बरोबरच आहोत, न्यायालयाचे अधिकार मर्यादित आहेत, असे तुम्ही म्हणून चालणार नाही. आम्हालाही अधिकार आहेत हे ध्यानात ठेवा, असे खडे बोल सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला सुनावले.

3. राज्याभिषेक दिनी 6 जूनला रायगडावर या :  संभाजीराजे
मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी खासदार संभाजीराजे राज्यव्यापी दौऱ्यावर असून, अनेक बड्या नेत्यांची ते भेट घेत आहेत. त्यातच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतल्यानंतर संभाजीराजेंनी 6 जूनपर्यंतचा अल्टीमेटम सरकारला दिला आहे. त्यासाठी, 5 महत्त्वाच्या मागण्यांचं निवेदनही संभाजीराजेंनी दिलं आहे. आता, नाशिकमधील मराठा बांधवांना रायगडावर येण्याचं आवाहन संभाजीराजेंनी केलंय.

4. नवजात बाळानं कोरोनावर मिळवला 'अभय'
सूरतच्या जिल्हा रुग्णालयातून एक सर्वात चांगली बातमी समोर येत आहे. याठिकाणी कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या महिलेनं नवजात बालकाला जन्म दिला. जन्मापासून गंभीर अवस्थेत असलेल्या या बाळानं १९ दिवस मृत्यूशी झुंज देऊन आजारातून बरा झाला आहे. जन्माच्या वेळीच आईला गमावलेल्या नवजात बाळाला वाचवण्यासाठी सामान्य रुग्णालयाच्या डॉक्टरांनी खूप प्रयत्न केले. त्यामुळे या बाळाला जीवदान मिळालं आहे.

6. राज्य मंडळाकडून इयत्ता दहावीच्या निकालाची तयारी
राज्य शासनाने दहावीच्या निकालाची मूल्यांकन पद्धती जाहीर केल्यानंतर, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने निकाल तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली असून, शाळांनी राज्य मंडळाला कोणत्या स्वरूपात गुण पाठवावेत, यासंदर्भातील आराखडा दि. १ जून रोजी प्रसिद्ध केला जाणार आहे.



No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *