Breaking News

1/breakingnews/recent

शहराची खबरबात - शहरातील नालेसफाईची पोलखोल

No comments

  News24सह्याद्री - शहरातील नालेसफाईची पोलखोल..पहा शहराची खबरबात मध्ये




TOP HEADLINES


1. समाज माध्यमावरील मजकुरावरून हल्ला  
समाज माध्यमावर प्रसारित केलेला मजकुरावरून तरुणावर खुनी हल्ला करण्यात आला शहरातील मुकुंदनगर उपनगरात घडली फेब्रिकेशन व्यवसायिक अरबाज बागवान व त्याचा मित्र अन्सार सय्यद हे मुकुंद नगर मधील वाबळे कॉलनीतून शनिवारी रात्री साडेआठ वाजता जात होते त्यावेळी इरफान सय्यद  व दोन तीन अनोळखी व्यक्तींनी अरबाज बागवान यांना थांबवले समाज माध्यमावरील मजकुरावरून वाद घालून या व्यक्तीने मारहाण केली. दिलेल्या फिर्यादीवरून भिंगार पोलीस ठाण्यात खुनी हल्ल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.

2. शहरातील नालेसफाईची पोलखोल
शहरात काल सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते सायंकाळी पाचच्या सुमारास आकाशात ढग दाटून आले विजांच्या कडकडाटासह पूर्व मोसमी पावसाला जोरदार सुरुवात झाली. शहरासह परिसरात पावसाने सुमारे तासभर दमदार हजेरी लावली या पावसामुळे शहरातील गटार सफाईच्या कामाची पोलखोल झाली तसेच अमृत योजनेमुळे शहरातील रस्ते खोदून ठेवल्याने रस्त्यांची दुरवस्था झाली आहे.दुरावस्था  कशी झाली आहे पाहुयात.

3. कोरोनाच्या प्रादुर्भावात जिल्हा परिषदेत गर्दी
कोरोना चा प्रादुर्भाव वाढलेला असताना प्रशासनाकडून कडक  उपाययोजना केल्या जात आहेत मात्र जिल्हा परिषदेत वाढता कोरूनातिल अभ्यागतांची गर्दी होत असल्यामुळे कर्मचारी धास्तावले असून प्रशासनाने गर्दीवर नियंत्रण आणावे अशी मागणी केली जात आहे . जिल्हा परिषद कामकाज भागात अभ्यागतांची गर्दी होत असून त्यांच्या वाहनांना प्रवेश नाकारला जात असल्यामुळे जिल्हा परिषदेच्या बाहेरच दुचाकी व चारचाकी वाहने उभी केली जात आहे.

4. सोमवारी शहरात एकाही केंद्रावर लस शिल्लक नाही  
कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी सर्वसामान्यांची ससे होलपट सुरू असतानाच महापालिका खिरापत वाटला प्रमाणे दररोज नव्या केंद्रांचे वाटप करत आहे यावर कळस असा की भाजपने रविवारी लसीकरण करून घेतल्याने सोमवारी एकही लसीकरण केंद्रांवर लस उपलब्ध नव्हती. त्यामुळे रांगा लावलेल्या अनेकांना लस मिळाली नाही . शहरातील लसीकरण मोहिमेचा पूर्णपणे फज्जा उडाला आहे.  सर्वसामान्य नागरिक या केंद्रावरून त्या केंद्रावर लस  घेण्यासाठी अक्षरशहा चक्र मारताना दिसत आहेत त्यांना लस  शिल्लक नाही उपकेंद्राला पाठवले आहे असे सांगून बाहेरचा रस्ता दाखवला जात आहे.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *