गॉसिप कल्ला - अजिंक्य देव यांचं छोट्या पडद्यावर दमदार कमबॅक
News24सह्याद्री - अजिंक्य देव यांचं छोट्या पडद्यावर दमदार कमबॅक...पहा गॉसिप कल्ला मध्ये
TOP HEADLINES
1. पवित्र रिश्ता-२’मध्ये अंकिता लोखंडेसोबत ‘हा’ अभिनेता
२००९ सालामध्ये छोट्या पडद्यावर आलेल्या ‘पवित्र रिश्ता ‘ या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं होतं. या मालिकेतील अर्चना आणि मानवच्या जोडीने चाहत्यांची मोठी पंसती मिळवली होती. या मालिकेमुळे दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत आणि अंकिता लोखंडे घराघरात पोहचले. मालिकेला २ वर्ष पूर्ण झाल्यानंतर अभिनेता सुशांत सिंह राजपूतने मालिका सोडण्याचा निर्णय घेतला आणि त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. असं असलं तरी अवघ्या २ वर्षात मानवच्या भूमिकेत झळकणाऱ्या सुशांतला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं होतं. त्यानंतर अभिनेता हितेन तेजवानी मानवच्या भूमिकेत झळकू लागला. आता या मालिकेचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
No comments
Post a Comment