Breaking News

1/breakingnews/recent

१ जून सह्याद्री बुलेटिन

No comments

News24सह्याद्री ‘एसटी’च्या मालवाहतुकीला उत्तम प्रतिसाद!...जाणून घ्या महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये




TOP HEADLINES

१. दिव्यांगाला विशेष लसीकरण मोहीम
लातूर जिल्ह्यात सर्वत्र आज आणि उद्या दिव्यांग व्यक्तीला विशेष लसीकरण मोहीम जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण व आरोग्य विभागाच्या वतीने राबवण्यात येत आहे. कोरोनाचा प्रादुर्भावात  दिव्यांग व्यक्तीना कोरोनाचा होऊ नये यासाठी जिल्ह्यातील सर्व लसीकरण बंद करून 1 आणि  2 जून या दोन दिवशी केवळ 4 हजार 120 दिव्यांग व्यक्तीला 46 आरोग्य केंद्र व 10 ग्रामीण रुग्णालयात लसीकरण करण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी सुनील खमितकर यांनी सांगितले आहे.

2. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असेपर्यंत मराठा आरक्षण अशक्य!
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मताचे कधीच नव्हते. यामुळेच ते मुख्यमंत्रीपदावर असेपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही, अशी टीका भाजपचे खासदार नारायण राणे यांनी सोमवारी ठाण्यातील पत्रकार परिषदेत केली. 

3. पुण्यातील शिवाजीराव भोसले सहकारी बँकेचा परवाना रद्द
पुण्यातील शिवाजीराव भोसले सहकारी बँकेचा परवाना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने २८ मे रोजी तत्काळ आदेश काढत रद्द केला. सहकार विभागाने केलेली शिफारस आणि पुरेसं भांडवल आणि उत्पन्नाचे आटलेले स्त्रोत यांसह विविध आर्थिक अनियमितांवर बोट ठेवत आरबीआयने ही कारवाई केली आहे. ३१ मे पासून बँकेला आपले व्यवहार बंद करण्याचे आदेश आरबीआयने दिले आहेत.

4. खुद्द सर्वोच्च न्यायालयानेच केंद्र सरकारला आठवण करून दिली”
लसीकरण कार्यक्रमाच्या रणनीतीवरून सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला फटकारले. न्यायालयाच्या मतांचा हवाला देत आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत आपली भूमिका मांडली. “भारत हे संघराज्य असल्याची आठवण खुद्द सुप्रीम कोर्टानेच सरकारला करून दिली, हे बरं झालं. 

5. शरद पवार-देवेंद्र फडणवीस भेटीवरून तर्कवितर्कांना उधाण
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. त्यावरून तर्कवितर्क वर्तवले जात आहेत. ही भेट राजकीय असल्याचीही जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र, सत्ताधारी आणि विरोधक दुश्मनासारखे कधीच काम करत नाहीत.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *