मोठी बातमी - समता परिषदेच्या वतीने आरक्षणासाठी ओबीसींचा एल्गार
News24सह्याद्री -
स्थानिक स्वराज्य संस्थेतील रद्द झालेले राजकीय आरक्षण पूर्ववत करावे तसेच ओबीसींची जातिनिहाय जनगणना करण्यात यावी या मागण्यांसाठी समता परिषदेच्या वतीने आज नगर मध्ये रस्ता रोको आंदोलन तसेच ओबीसींच्या आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे ओबीसींचे नेते आणि राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर ओबीसींचा आक्रोश मोर्चा आयोजित केला आहे त्यानुसार नगर मध्ये सकाळी इंपीरियल चौकात छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. सुरवातीला समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आंदोलनाला सुरु केली. तर मोठं मोठ्या घोषणाबाजी करत तब्बल अर्धा तास रास्ता रोको करण्यात आलं रस्ता रोको आंदोलन करत आक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे ओबीसी समाजावर होत असलेला अन्याय दूर स्थानिक स्वराज्य संस्थेतील रद्द झालेले आरक्षण पूर्ववत करावी तसेच ओबीसींची जातिनिहाय जनगणना करावी या दोन प्रमुख मागण्यांसह अनेक प्रलंबित मागण्या यावेळी मांडण्यात आले आहेत सदर मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले असल्याची माहिती समता परिषदेच्या नगर शहर व जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांनी दिलीये.
No comments
Post a Comment