18 जून सह्याद्री बुलेटिन
News24सह्याद्री - भुजबळ, पंकजा मुंडे, पटोले, संजय राठोड येणार एकाच मंचावर ..!. जाणून घ्या महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये
TOP HEADLINES
1. भुजबळ, पंकजा मुंडे, पटोले, संजय राठोड येणार एकाच मंचावर येणार..!
खासदार संभाजी छत्रपती यांनी मराठा आरक्षणासाठी मूकमोर्चा काढला. यावेळी सर्वपक्षीय मंत्री, आमदार आणि खासदार उपस्थित होते. त्याच पार्श्वभूमीवर आता राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी राज्यातील सर्वपक्षीय ओबीसी नेत्यांना एकाच मंचावर आणण्याच्या हालचाली सुरू केल्यात. भाजप नेत्या पंकजा मुंडे, राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि शिवसेनेचे आमदार संजय राठोड यांना एकाच मंचावर आणण्यात येणार असल्याचं विजय वडेट्टीवार यांनी सांगितलंय.
No comments
Post a Comment