मोठी बातमी - अमहदनगर जिल्हा उद्यापासून अनलॉक, पहा काय सुरु आणि काय बंद.
News24सह्याद्री -
गेल्या दोन महिन्यापासून सर्वत्र व्यवहार बंद होते राज्यशासनाने काल नवीन नियमावली जाहीर करून अनेक जिल्ह्यांमध्ये निर्बंध उठवण्यात आले आहेत त्यानुसार नगर जिल्ह्यामध्ये सर्व निर्बंध उठले असून उद्या दि 7 रोजी नियमित वेळेमध्ये सर्व व्यवहार सुरळीतपणे चालू राहतील असे आदेश जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी दिले आहेत काल निर्बंध उठल्याची घोषणा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केली होती त्यानुसार प्रशासनाने आज लेखी आदेश दिले आहेत .
बिगर अत्यावश्यक वस्तूंशी संबंधीत दुकाने,आस्थापना त्यांचे नियमित वेळेत कार्यरत राहतील.म्हणजेच मॉल, चित्रपटगृहे (मल्टीपेक्स तसेच सिंगल स्क्रिन), नाटयगृहे 50% क्षमतेने नियमित वेळेत कार्यरत राहतील. रेस्टॉरंट नियमित वेळेत कार्यरत राहतील, सार्वजनिक ठिकाणे, खुली मैदाने, जॉगिंग पार्क याठिकाणी वावर करण्यास निर्बंध असणार नाहीत. ,. खाजगी कार्यालये त्यांच्या नियमित वेळेत कार्यरत राहतील., सर्व शासकीय तसेच खाजगी कार्यालये 100% उपस्थितीसह कार्यरत राहतील. सर्व क्रिडाविषयक क्रियाकल्प चालू ठेवणेस परवानगी असेल. सर्व प्रकारच्या चित्रीकरणांवर कुठलेही निर्बंध असणार नाहीत.
बंदीस्त सभागृहामध्ये लग्न समारंभाचे आयोजनास एकुण आसन क्षमतेच्या 50 टक्के किंवा 100 व्यक्तीं या पैकी जे कमी असेल तितक्या व्यक्तीच्या उपस्थितीस परवानगी राहील. तसेच खुल्या जागेतील लग्न समारंभाचे आयोजनास जास्तीत जास्त 100 व्यक्तींच्या उपस्थितीस परवानगी राहील. अंत्यविधीस 50 व्यक्तींच्या मर्यादेत परवानगी राहील असे आदेशात म्हटले आहे. स्थानिक स्वराज्य संस्था , सहकारी संस्थांच्या सर्वसाधारण सभा आयोजनास/ निवडणूकांस निर्बंध असणार नाहीत.,. सर्व प्रकारचे बांधकाम क्रियाकल्प चालू राहतील., कृषीविषयक सर्व क्रियाकल्प चालू राहतील. वस्तू व सेवांचे ई-कॉमर्स व्यवहार चालू राहतील. , व्यायामशाळा, सलुन, ब्युटीपार्लर, स्पा, वेलनेस सेंटर नियमित वेळेत चालू राहतील., सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कुठल्याही निर्बंधाविना चालू राहिल. सर्व प्रकारची कार्गों वाहतूक (चालकासह जास्तीत जास्त 3 व्यक्तींसह) चालू राहील. , खाजगी कार/टॅक्सी / बस /दिर्घ पल्ल्याच्या रेल्वे याद्वारे आंतरजिल्हा प्रवासी वाहतूकीस मुभा असेल. तथापि,
या आदेशान्वये ज्या अटी आहे, सर्व ठिकाणी कोविड अॅप्रोप्रियेट बिहेवीयरचे पालन करणे बंधनकारक असेल व याबाबतच्या अंमलबजावणीची जबाबदारी संबंधीत अनुज्ञप्ती प्राधिकारी, स्थानिक प्राधिकरण, पोलीस विभाग, परिवहन विभाग इ. यांची राहील. शासकीय व खाजगी कार्यालयांमध्ये कोविड अॅप्रोप्रियेट बिहेवीयरची अंमलबजावणीची जबाबदारी संबंधीत विभाग प्रमुखाची राहील असे आदेशात म्हटले आहे.
No comments
Post a Comment