मोठी बातमी - शाहू महाराजांच्या समाधी स्थळापासून मूक आंदोलनाला सुरवात
News24सह्याद्री -
सकल मराठा समाजाच्या आरक्षणाचा विविध मागण्या बाबत आज पासून मूक आंदोलन सुरू करण्यात आलं आहे कोल्हापूर येथील शाहू महाराजांच्या समाधी स्थळापासून या आंदोलनास सुरुवात झाली आहे. पाऊस असूनही अनेक कार्यकर्ते या ठिकाणी सकाळपासूनच गर्दी करून होते. संभाजी महाराज छत्रपती यांच्या सह वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर भारतीय जनता पार्टीचे आमदार चंद्रकांत पाटील सतेज पाटील धैर्यशील माने यांच्यासह विविध पक्षातील नेते आणि कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले आहेत. राज्यभरातील मराठा आंदोलनाची समन्वयक यांनीही याठिकाणी हजेरी लावली आहे तर भाजपने या आंदोलनाला पाठिंबा दिले असल्याचे पत्र चंद्रकांत पाटील यांनी संभाजी महाराजांना दिला आहे. आज पासून सुरू झालेलं हे मूक आंदोलन आता संपूर्ण राज्यभरात होणार आहे त्यामुळे आता राज्य सरकारला आणि केंद्र सरकारला या मागण्यांबाबत गांभीर्याने विचार करावा लागेल.
No comments
Post a Comment