शहराची खबरबात - जिल्हा परिषदेच्या अहवालात नवीन खुलासा
News24सह्याद्री - जिल्हा परिषदेच्या अहवालात नवीन खुलासा... पहा शहराची खबरबात मध्ये
TOP HEADLINES
1. जिल्हा परिषदेच्या अहवालात नवीन खुलासा
नगर जिल्ह्यातील 100% प्राथमिक शिक्षक त्यांची नियुक्ती ज्या गावात आहे तिथेच राहतात, असा अहवाल जिल्हा परिषद प्रशासनाने दिला आहे. सर्व शिक्षक खेडोपाडी निवासी राहत असल्याने कोरोना मुक्त गावात शाळा सुरू कराव्यात अशी मागणी त्यामुळे जिल्हा परिषद सदस्यांनी केली आहे. जिल्हा परिषद सदस्य राजेश प्रधान यांनी किती कर्मचारी मुख्यालयी राहतात असा प्रश्न सर्वसाधारण सभेत उपस्थित केला होता , त्यावर लेखी उत्तर देताना प्रशासनाने आपल्या 15000 कर्मचाऱ्यांपैकी ९९ टक्क्याहून अधिक कर्मचारी मुख्यालयी राहतात असे सांगितले आहे त्यात 11 हजार 293 प्राथमिक शिक्षक असून त्यापैकी 15 शिक्षक वगळता सर्व मुख्यालयात राहतात असा प्रशासनाचा अहवाल आहे. या मुख्यालयात राहण्याचा भत्ता या सर्व शिक्षकांना दिला जातो असेही यावेळी सांगण्यात आल.
No comments
Post a Comment