Breaking News

1/breakingnews/recent

शहराची खबरबात - राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केले गणेश मंडळांचे कौतुक

No comments

News24सह्याद्री - राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केले  गणेश मंडळांचे कौतुक..पहा शहराची खबरबात मध्ये




TOP HEADLINES

1. कुत्र्याला मारहाण पडली महागात
सावेडीत एका कुत्र्याला बेदम मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. याबाबत वाघ्या फाउंडेशनचे सर्वेसर्वा सुमीत वर्मा यांनी पोलिसात धाव घेतली होती. तोफखाना पोलिसांनी अखेर अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

2. आयसोलेशन साहित्याची चोरी करणारे आरोपी  जेरबंद 

नगर शहरातील जिल्हा रुग्णालय येथून आयसोलेशन साहित्याची चोरी करणारा आरोपी काही तासातच मुद्देमालासह नगर च्या स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले  आहे लखन घोरपडे आणि मुरलीधर पाखरे या दोघांनी मिळून जिल्हा  रुग्णालयाच्या आवारातील वेटिंग रूम चा दरवाजा तोडून ८१ हजार रुपयांचे आयसोलेशन व्हाल्व  चे साहित्य चोरून नेले होते या चोरीची फिर्याद ऋषी कला यांनी तोपखाना पोलीस ठाण्यात नोंदवल्या  नंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपींना अटक केली आहे.

3. लसीकरण केंद्रात वाढदिवसाचा धुमधडाका
अहमदनगर महानगर पालिकेच्या आरोग्य विभागात नेमकं चाललंय काय हा प्रश्न आता नागरिकांना पडला आहे आरोग्य अधिकाऱ्यांचा वाढदिवसाचा व्हिडीओ व्हायरल  झाल्यानंतर आयुक्तांनी त्यांना करणे दाखवा नोटीस बजावली होती हे प्रकरण ताजे असतांनाच एका महिला कर्मचाऱ्याने आरोग्य विभागातच वाढदिवस साजरा केल्याचा विडिओ व्हायरल झाला होता या प्रकरणी चर्चा थांबत असतांनाच पुन्हा एकदा सोसलं मीडिया वर एका राजकीय नेत्याच्या मुलाबरोबर लसीकरण केंद्रातील एका कर्मचाऱ्याचा वाढदिवस आरोग्य केंद्रातच साजरा होत असल्याचे विडिओ व्हायरल होत आहे.

4. राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केले  गणेश मंडळांचे कौतुक 
नगर शहरातील माजी नगर सेवक धंनजय जाधव याना थेट राज्याचे सार्वजनिक बांधकाम व नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे पत्र आले असून धंनजय जाधव यांनी गणेश मंडळाच्या माध्यमातून लोकांना विश्वासात घेऊन लसीकरणाची जी मोहीम राबवली आहे.

5. नगर शहरातील सराफ मार्केट सुरु करावे  
गेल्या दोन महिन्यांपासून प्रशासनाने लावलेल्या निर्भान्धामुळे अनेक बाजार पेठ बंद होत्या मात्र एक जून पासून प्रशासनाने बाजारपेठेतील काही दुकानांना ठराविक वेळेत दुकाने उघडण्याची मुभा दिली आहे त्यामुळे नगर शहरातील सराफ मार्केट सुरु करावे व ज्या बाजार पेठेचा वेळ १२ ते ६ किंवा प्रशासनाला योग्य वाटेल ते वेळ देऊन लवकरात लवकर सुरु करावे अशी मागणी सराफ मार्केट असोशिएशन च्या वतीने शहराचे आमदार संग्राम जगताप यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *