गॉसिप कल्ला - विद्या बालनच्या ‘शेरनी’चा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित
News24सह्याद्री -
TOP HEADLINES
1. 'बिग बॉस १५’ मध्ये दिसणार रिया चक्रवर्ती ?
अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यू प्रकरणानंतर चर्चेत आलेली अभिनेत्री म्हणजे रिया चक्रवर्ती. मध्यंतरी काही काळ या चर्चेला विराम मिळाला होता. पण आता पुन्हा तिच्याबद्दल चर्चा सुरु झाल्या आहेत. या चर्चेचं कारणही तसंच आहे. बॉलिवूडचा ‘दबंग’ अभिनेता सलमान खानचा लोकप्रिय शो ‘बिग बॉस’ च्या आगामी १५ व्या सीजनमध्ये रिया चक्रवर्ती दिसणार याबाबत सध्या चर्चेचं गुऱ्हाळ सुरूय. त्यामुळे टीव्ही शोमधून अभिनेत्री रिया चक्रवर्ती स्क्रीनवर पुन्हा एकदा कमबॅक करू शकते.
2. नव्या डान्स व्हिडीओमुळे दीपिका सिंह पुन्हा ट्रोल
‘दीया और बाती हम’ या लोकप्रिय मालिकेमुळे अभिनेत्री दीपिका सिंहला खरी ओळख मिळाली. या मालिकेतील दीपिकाच्या भूमिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. लग्नानंतर दीपिकाने टीव्हीपासून थोडा ब्रेक घेतला असला तरी सोशल मीडियावर ती चांगलीच सक्रिय आहे. सोशल मीडियावर फोटो आणि वेगवेगळे व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांचं मनोरंजन करत असते.
3. सुनावणी दरम्यान गात होता जूही चावलाच्या चित्रपटातील गाणं
बॉलिवूड अभिनेत्री जूही चावलाने देशात 5G वायरलेस नेटवर्क सुरु करण्याविरोधात दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल केली होती. बुधवारी या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी सुरु होती. 5G नेटवर्कच्या रेडिएशनमुळे म्हणजेच विकिरणांमुळे फक्त मानवी जीवनावरच नाही तर प्राणी आणि वनस्पतींवर देखील याचा दुष्परिणाम होऊ शकतो असं जूही चावलाने दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे.
4. विद्या बालनच्या ‘शेरनी’चा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित
आपल्या अभिनयाच्या जोरावर स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे विद्या बालन. लवकरच विद्याचा ‘शेरनी’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वी विद्याने या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले होते. आता या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.
5. हॉलिवूडनंतर आता तुर्की सिनेमातही रोबोट साकारणार मुख्य भूमिका
येत्या काळात हॉलिवूड आणि बॉलिवूड सिलिब्रिटींच्या जागी प्रत्येक सिनेमात यंत्रमानव झळकल्यास आश्चर्य वाटायला नको. अभिनय क्षेत्रात हॉलिवूडमध्ये तर आधीच यंत्रमानवाच्या पदार्पणाची तयारी सुरु आहे. यातच आता तुर्कीमध्ये देखील एका यंत्रमानवाने एक सिनेमा साइन केलाय ..होय ! हे प्रत्यक्षात घडू लागलंय आतापर्यंत सिनेमांमध्ये वि एफ एस्क तंत्रज्ञानाच्या मदतीने युद्ध परिस्थिती किंवा रोबोट चित्रीत केले जातं होते.
No comments
Post a Comment